अरुण जंगम
म्हसळा : तालुक्यात या आठवड्यात परतीचा पाऊस पडल्यामुळे शेतकºयाच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. कोकणातील कापणीला आलेले भाताचे पीक मोठ्या प्रमाणात कोलमडून पडले होते. संभाव्य पावसामुळे आणखी नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पावसामुळे काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतक-यांच्या तोंडी आलेला घास वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर रानडुकरे, अन्य श्वापदे शेतकºयांना त्रास देत असून, पिकाचे नुकसान करीत आहेत. भातशेती आडवी झाली असून, शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतातील उभ्या पिकाचे काढणीचे नियोजन करावे. तसेच ज्या शेतकºयांनी पिके काढली असतील त्यांनी ती सुरक्षित ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.शेतकरी हवालदिलयंदा अनेक वर्षांनंतर राज्याच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे आठवड्यात पावसामुळे शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी पावसामुळे शेतकºयांनी केलेली मेहनत वाया जाणार आहे. तालुक्यात भातशेतीप्रमाणेच नाचणी, वरी, काळे तीळ, तूर, चवळी, उडीद अशी पिके जमीनदोस्त झाली आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.