शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:45 PM

गेल्या २४ तासांत १५०० मि.मी. पाऊस । सखल भागांमध्ये शिरले पाणी । पोस्ट ऑफिसची भिंत कोसळली

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल एक हजार ५०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा तडाखा जोरात असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले होते. समुद्रकिनारी असणाऱ्या घरांमध्ये तसेच चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. पावसाच्या तडाख्याने अलिबाग पोस्ट आॅफिसची संरक्षक भिंत कोसळली. धुवाधार पावसामुळे रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गुरुवारी ओलांडली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक संथगतीने पुढे सरकत होती. पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून धुवाधार बरसण्यास सुरुवात केली. गेल्या २४ तासांत सर्वाधिक १८० मि.मी. पाऊस पेण तालुक्यात झाला, तर सर्वात कमी ४५ मि.मी. पावसाची नोंद सुधागड-पाली तालुक्यात झाली आहे.

गुरुवारी पावसाचा जोर कायम होता, तसेच मुंबई-गोवा या राष्ट्रीय मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे एसटीच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. प्रवाशांना तासन्तास एसटीची वाट पाहत बसावे लागल्याचे दिसून आहे. कुं डलिका नदीच्यापाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून नदीकिनारी असणाºया गावांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. या संततधार पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी करपणाºया भात रोपांना नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.

नेरळ-माथेरान घाटात जुने झाड कोसळलेनेरळ : गुरुवारी दुपारच्या सुमारास नेरळ-माथेरान घाट रस्त्यात शेकडो वर्षांपूर्वीचे झाड रस्त्यावरच कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु दोन तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे माथेरान घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान, रस्त्यावर प्रवाशांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाच्या सहकार्याने दोन तासांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.

आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सुरुवात केली आहे. दोन दिवस सतत पावसाने सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी जमिनीत दलदल होऊन झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच गुरुवारी दुपारच्या सुमारात नेरळ-माथेरान घाट रस्त्यात शेकडो वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. भले मोठे झाड असल्याने सुमारे दोन तास वाहतूक बंद झाली होती आणि त्यामुळे माथेरान घाटात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला.

टॅग्स :Rainपाऊस