मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 11:51 PM2019-07-27T23:51:28+5:302019-07-27T23:51:39+5:30

नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

Rainfall increased in the watershed area of the Morbe dam | मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Next

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून दिवसाला ४३0 एमएलडी इतके पाणी पुरविले जाते. या वर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यामुळे महापालिकेने शहरात दहा टक्के पाणी कपात जाहीर केली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे जोरदार अगमन झाले. आठ दहा दिवस धो धो कोसळलेल्या पावसामुळे मोरबे धरणाच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली. मात्र, त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारली. असे असले, तरी शेवटच्या आठवड्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवार सकाळी ८.३0 ते शनिवार ८.३0 या चोवीस तासात धरण क्षेत्रात ३३0 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाची पातळी जवळपास दोन मीटरने वाढली आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. सध्या ही पातळी ८१.७0 मीटरपर्यंत पोहोचली आहे. २५ जुलै रोजी ही पातळी ७९.४५ मीटर इतकी होती. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण भरायला वेळ लागणार नाही, असा विश्वास महापालिकेच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.

मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. ही पातळी गाठण्यासाठी सरासरी ३000 मीमी पावसाची गरज असते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपर्यंत २0१७.६0 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरण भरण्यासाठी आणखी साधारण १000 मीमी पावसाची गरज आहे.

Web Title: Rainfall increased in the watershed area of the Morbe dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.