- जयंत धुळप, अलिबाग
यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १४ हजार ४३५.४० मि.मी. पाऊस झाला होता. त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या एकूण पर्जन्यमानात २ हजार ७२३.८० मि.मी.ने वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण २८ लघुपाटबंधारे धरणांपैकी ५० टक्के म्हणजे १४ धरणे तुडुंब भरुन वाहू लागली आहेत. २८ पैकी उर्वरित एक धरण ७५ टक्केपेक्षा अधिक, चार धरणे ५० ते ७५ टक्के, पाच धरणे २५ ते ५० टक्के तर चार धरणे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरली असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड येथील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.१०० टक्के भरलेल्या १४ लघुपाटबंधारे धरणांमध्ये, मुरुड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी, सुधागड तालुक्यातील कोडगांव ,कवेळे आणि उन्हेरे, श्रीवर्धन तालुक्यातील कुडली, म्हसळा तालुक्यातील पाभरे आणि संदेरी, महाड तालुक्यातील खिंडवाडी, कोथुर्डे आणि खैरे तर खालापूर तालुक्यातील भिलवले या धरणांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील या १४ धरणांमध्ये ४ जुलै रोजी किमान जलपातळी ५३ मीटर तर कमाल जलपातळी १४९ मीटर आहे. या सर्व धरणांची एकूण जलसंचय क्षमता ६८.२८६ दशलक्ष घनमीटर असून ४ जुलै रोजी या सर्व धरणांमध्ये संचित जलसाठा ४८.१९४ दशलक्ष घनमीटर झाला आहे. - पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असलेल्या धरणांमध्ये आंबेघर (ता.पेण), श्रीगांव (ता. अलिबाग), घोटवडे (ता. सुधागड), ढोकशेत (ता. सुधागड), कार्ले (ता.श्रीवर्धन), रानवली (ता. श्रीवर्धन), वरंध (ता. महाड), साळोख (ता. कर्जत), अवसरे (ता.कर्जत), कलोते-मोकाशी (ता. खालापूर), डोणवत (ता. खालापूर), मोरबे (ता. पनवेल), बामणोली (ता. पनवेल), उसरण (ता. पनवेल) आणि पुनाडे (ता. उरण) यांचा समावेश आहे. अलिबाग- पेण मार्गावरील तीनवीरा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहे. पर्यटक आणि वर्षाविहारप्रेमींकरिता तीनवीरा धरण हे एक पर्वणीच ठरत आहे.माथेरानमध्ये सर्वाधिक १४४ मि.मी. पाऊसअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासात जिल्ह्यात एकू ण १२६६.७० मि.मी. पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान ७९.१७ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकू णपाऊस १४,४३५.४० मि.मी. होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, उरण, महाड, पनवेल, मुरु ड, पोलादपूर, माणगांव या तालुक्यांमध्ये गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर होता मात्र सोमवारी पहाटेपासून जोर कमी झाला आहे. जिल्ह्यातील एकू णअपेक्षित पावसापैकी ३४.९५ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास व गाढी या सहा प्रमुख नद्यांची जलपातळी नियंत्रणात आहे. त्यामुळे रस्त्यांवर साचलेले पाणी ओसरत आहे. या परिसरातील जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. कोठेही पुराचा धोका नसल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.