महाड तालुक्यात वादळी पाऊस, ग्रामीण भागातील घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:00 AM2017-10-04T02:00:11+5:302017-10-04T02:01:26+5:30
गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना सोमवारी रात्री जोरदार वादळी पाऊस झाला.
बिरवाडी : गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना सोमवारी रात्री जोरदार वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांचे नुकसान झाले तर भात शेतीवर या वादळाचा परिणाम होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
महाड तालुक्यामध्ये मागील दोन-तीन दिवस सायंकाळी कोसळणाºया पावसामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम होत असताना सोमवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये काही घरांचे किरकोळ नुकसान झाले.
कोतुर्डे गावातील प्रकाश ठोंबरे यांच्या घरावर झाड कोसळल्याने सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले, तर वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. सवाद, धारवली या गावांमध्ये पाच विजेचे खांब कोसळल्याने गेले चार दिवस या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून तातडीने विजेचे खांब बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
औद्योगिक वसाहतीसह जीते, धामणे, टेमघर, आसनपोई, वाघोली, पाने, पंदेरी, कोंझर, नाते, नांदगाव या काही गावांना देखील वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.
तालुक्यामध्ये भाताचे पीक समाधानकारक असले तरी अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांकडून चिंता व्यक्त के ली जात आहे.