रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:53 AM2018-06-10T06:53:57+5:302018-06-10T06:53:57+5:30
रायगड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोर धरला असून, शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात मुरुड येथे सर्वाधिक १३४ मि.मी. तर पनवेल येथे १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोर धरला असून, शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात मुरुड येथे सर्वाधिक १३४ मि.मी. तर पनवेल येथे १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अलिबाग-४४, पेण-३८, उरण-७२, कर्जत-१२.२०, खालापूर-४४, माणगाव-६०, रोहा-४२, सुधागड-२०, तळा-५५, महाड-४०, पोलादपूर-३९, म्हसळा-९५.२०, श्रीवर्धन- ९५.२० आणि माथेरान येथे २७.५० मि.मी. तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५९.४२ मि.मी. आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासात आपल्या ट्रेनचा वेग नियंत्रित केला आहे. परिणामी, कोकण रेल्वे काहीशा विलंबाने धावत आहे.
पाणीच पाणी
पनवेल तालुक्यातील विमानतळबाधित कोंबडभुजे गावात पहिल्याच पावसात पाणीच पाणी साचले. यात ८ ते १० घरांत पाणी शिरले असून सिडकोने केलेल्या भरावामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे ग्रामस्थांनी म्हणणे आहे.
विमानतळाच्या कामाचा परिणाम
च्विमानतळाचे काम सुरू झाल्यापासून गावात पावसाचे पाणी येत आहे. गतवर्षीही पाणी गावात घुसले होते, यावर्षी ही परिस्थिती आणखी भयानक होणार असल्याचे मत सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.
च्नामदेव कोळी, दत्तात्रेय कोळी, दीनानाथ कोळी, केशव कोळी, संतोष कोळी, सुरेश पाटील यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
च्नवी मुंबई विमानतळ भरावामुळे कोंबडभुजे गावात व प्राथमिक शाळेत पावसाच्या पुराचे पाणी जाऊन मनुष्य व वित्तीयहानी होण्याची शक्यता असल्याचा पत्रव्यवहार सिडकोकडे करण्यात आलेला आहे.
भीतीचे वातावरण
च्पनवेल परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावाच्या स्थलांतराचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. गावातून स्थलांतरित होण्यास काहींचा विरोध आजही कायम आहे. गावाच्या आजूबाजूला माती व दगडांचा भराव केला जात आहे. कोंबडभुजे गावातील नाल्यात विमानतळाच्या भरावाची माती गेल्याने नाला बुजला आहे. त्यामुळे ८ जून रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचा गावातील काही घरांना फटका बसला.
च्पावसाचे पाणी घरात घुसल्याने गावातील १० घरांचे नुकसान झाले. तर जिल्हा परिषदेच्या शाळेतदेखील पाणी शिरले. पहिल्याच पावसात कोंबडभुजे गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या वेळी तलाठ्यातर्फे पंचनामा करण्यात आला आहे.
शंभर वर्षांहून जुना वटवृक्ष कोसळला
पनवेल : संपूर्ण गावच नव्हे, तर खारघर शहर नव्याने विकसित झाल्याची साक्ष देणारे कोपरा गावातील १०० वर्षाहून जुना वटवृक्ष शनिवारी सकाळी उन्मळून पडला. वादळी वाऱ्यामुळे गेला दोन-तीन दिवसांपासून परिसरात वृक्ष कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. हे वृक्ष वीज खांब अथवा वीज वाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. शुक्र वारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हा वटवृक्ष कोसळला असल्याचे बोलले जात आहे. या वेळी झाडाखाली उभ्या असलेल्या गाड्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.
मुरुड परिसरात
२२ तास वीज खंडित
च्बोर्ली मांडला : दीव आणि सावरोली दरम्यान असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या ट्रान्सफार्मरवर वीज पडल्याने बोर्ली मांडला विभागासहित साळाव, चोरडे, आणि कोकबन विभागातील विद्युत प्रवाह २२ तासांहून अधिक काळ खंडित झाला आहे.
च्शुक्र वारी संध्याकाळी ७च्या सुमारास मुसळधार पावसामुळे मुरूड तालुक्यात विद्युतपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी सावली ते काशीदपर्यंतचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, बारशिव ते तलेखार कोकबनपर्यंतचा विद्युतपुरवठा २२ तास उलटले तरी सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
च्याबाबत मुरुड विभागातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे उपअभियंता सचिन येरेकर यांच्याकडे विचारणा केली असता, ट्रान्सफार्मरवर वीज पडल्याने पुरवठा खंडित झाला असून, कर्मचारी रात्रभर पावसात काम करीत आहेत. लवकरच सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.