महाड, पोलादपूरमध्ये वादळासह गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:57 AM2018-04-18T00:57:09+5:302018-04-18T00:57:09+5:30

महाड शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची हानी झाली, तर काही ठिकाणी झाडांची पडझड झाली.

 Rainfall with thunderstorms in Mahad, Poladpur | महाड, पोलादपूरमध्ये वादळासह गारांचा पाऊस

महाड, पोलादपूरमध्ये वादळासह गारांचा पाऊस

googlenewsNext

महाड/पोलादपूूर : महाड शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची हानी झाली, तर काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. महाड औद्योगिक क्षेत्रातील काही ठिकाणी व टेमघर येथे वादळासह गारांचा पाऊस पडला. दुपारी ३ वाजता अचानक झालेल्या वादळात रायगड विभागात खर्डी, पाचाड आदी गावांतील घरांची छपरे उडून घरांची हानी झाली, तर काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत. औद्योगिक क्षैत्रात दोन ठिकाणी झाडे कोसळली आहेत.
पोलादपूर शहरासह कशेडी, पळचिल विभाग अडावळे कामथे विभाग, लोहारे तुर्भे विभागासह आसपासच्या भागात कोसळलेल्या अवकाळी वादळी पावसाने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर काही झाडांच्या फांद्या तुटल्या. पावसामुळे गुरांचा चारा पावसाने भिजल्याने शेतकरी चिंतित झाला आहे.
कशेडी परिसरातील पळचिल व आसपासच्या भागात गारांचा पाऊस कोसळला असून, या भागात लग्नकार्यासाठी उभारण्यात आलेले मंडप वादळामुळे कोलमडले. पोलादपूर ग्रामीण रुग्णालय, लोहारे परिसरात झाडे पडल्याची घटना घडली आहे. दीड तास कोसळणाऱ्या सोसाट्याच्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष पडले असले, तरी उशिरापर्यंत नुकसानाची माहिती हाती आली नाही. देवळे येथेही घराचे पत्रे उडून नुकसान झाल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Web Title:  Rainfall with thunderstorms in Mahad, Poladpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस