कार्लेखिंड : अवकाळी पावसाने सोमवारी सकाळी रायगड जिल्ह्यात हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतक-यांची तारांबळ झाली.कोंदट हवामान असतानाच अचानक सोमवारी सकाळी साडेसात वाजता अलिबाग तालुक्यातील पोयनाडपासून पेणपर्यंत पाऊस झाला. शेतक-यांची सध्या मळणीची कामे जोरदार चालू आहेत. पावसामुळे चालू असलेल्या मळण्या झाकून ठेवाव्या लागल्या. तसेच पाऊस जास्त वेळ पडला तर भाताच्या उडव्यांमये पाणी जाऊ नये म्हणून प्लॅस्टिक कापडाने झाकण्याची सर्वांची धडपड सुरू झाली. कोंदट हवामानामुळे आंब्यावर कीड पडण्याची शक्यता शेतक-यांनी वर्तविली आहे.>रेवदंड्यामध्ये शेतक-यांची तारांबळरेवदंडा : सोमवारी सकाळी सात वाजता पावसाचा शिडकावा झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शाळेत जाणारे विद्यार्थी अनेक ठिकाणी पावसाच्या शिडकाव्याने थांबलेले दिसले. सुपारी बागायतदार धास्तावले आहेत. ग्रामीण भागात भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात असून शेतकरी विवंचनेत सापडला आहे.>शेतकरी धास्तावलानागोठणे : सकाळी उजाडतानाच पावसाने अचानक हजेरी लावल्याने शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणाºया नोकरदारांची धांदल उडाली.साधारणत: १५ मिनिटे पाऊस पडल्याने शहरातील रस्त्यांसह मुंबई - गोवा महामार्ग पाण्याने ओला झाल्याने काही काळ वाहने संथगतीने मार्गक्र मण करीत होती.काही ठिकाणी भाताची झोडणी बाकी असतानाच पाऊस पडल्याने शेतकरी धास्तावले होते. मात्र, पाऊस लगेचच थांबल्याने नुकसानीपासून वाचलो,असे शेतकरी सांगतात.
रायगडमध्ये अवकाळी पाऊस, नागरिकांसह शेतक-यांची उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 2:35 AM