पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:45 AM2019-07-05T00:45:44+5:302019-07-05T00:45:56+5:30

मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात.

Rainy tourist sites, tourist administration radar | पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर

पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर

googlenewsNext

- आविष्कार देसार्ई

अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने निसर्गाने हिरवी शाल पांघरल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. पावसाळ्यात येथील स्थळे त्यांना आकर्षित करतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी, छेडछाडीचे प्रकार, गड-किल्ल्यावर मद्यपान करणे असे प्रकार होतात. त्यातून तेथील पर्यटन स्थळांवर आपत्तीसारख्या घटना घडतात. यावर जिल्हा प्रशासनाने बंधने आणली आहेत.
तसेच गड-किल्ल्यांवर जाण्यासाठी गाइड घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच आता पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.
मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. दिवाळीपासून ते मे महिन्यापर्यंत पर्यटनाचा हंगाम असला तरी पावसाळ््यातही पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
उत्साहाच्या भरात काही पर्यटक नियम, कायदे धाब्यावर बसवतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ््यात पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्यांवर जाणे पसंत करतात. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग तालुक्यातील सिद्धेश्वर, तीनवीरा धरण, पनवेल तालुक्यातील पांडवकडा, गाढेश्वर धरण, खालापूर तालुक्यातील झेनिथ, कर्जतमधील आषाणे, सोलनपाडा, माणगाव तालुक्यातील देवकुंड, ताम्हाणी घाटातील धबधबे आदींचा समावेश आहे. या ठिकाणी पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालतात, महिला-मुलींची छेड काढतात, समुद्राच्या पाण्यात खोलवर जातात. त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्याने पर्यटकांना प्राणही गमावावे लागले आहेत.
पर्यटकांना सुरक्षा मिळावी, कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने पर्यटकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. खास करून पावसाळी पर्यटन करण्यासाठी येणाºया पर्यटकांना आपली नोंदणी करून स्थानिक गाइडला घेऊनच गड-किल्ल्यांवर पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. तसेच कोथळी गड (पेठ किल्ला), इरशाळगड (कर्जत), प्रबळगड (पनवेल) या ठिकाणीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई केली आहे. गड-किल्ल्यांवर पर्यटन करताना आता गाइड सोबत घ्यावा लागणार आहे. गड , किल्ल्यांवर जाताना स्थानिक प्रशासनास पर्यटकांची नावे व संपर्क क्र मांक देवून नोंदणी करावी लागणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडे नावनोंदणी करावी लागणार आहे. गड-किल्ल्यांवर मद्यपान करणाºया पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- वन विभागाच्या हद्दीत येथील कर्मचारी पर्यटकांवर लक्ष ठेवून नोंदणी करणार आहेत. हुल्लडबाज, छेडछाड करणाºयांवरही पोलीस दलाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे स्वागतच आहे, जीव धोक्यात घालू नका, अथवा कायदा मोडू नका तसे झाल्यास कडक कारवाई करणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या गोष्टींची काळजी घ्या
प्रशासनाच्या नियमाचे पालन करा
मद्यपान करून हुल्लडबाजी करू नका
महिला-मुलींची छेडछाड करू नका
धोकादायक ठिकाणी जाणे टाळा
मद्यप्राशन करून वाहन चालवू नका
पर्यटनस्थळांवर महिला, मुली, लहान बालके आणि वयोवृद्धांची काळजी घ्या
खोल पाण्यात जाऊ नका

Web Title: Rainy tourist sites, tourist administration radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड