रायगड जिल्ह्यात २४ तासात ७३६ मिमी पाऊस
By admin | Published: June 25, 2017 03:13 PM2017-06-25T15:13:31+5:302017-06-25T15:13:31+5:30
रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात एकुण ७३६.२० मिमी पावसाची नोंद झाली असून, रविवारी पहाटे पासून अंबा आणि कुंडलिका
जयंत धुळप/ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. 25 - रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात एकुण ७३६.२० मिमी पावसाची नोंद झाली असून, रविवारी पहाटे पासून अंबा आणि कुंडलिका नदिच्या जलपातळीत वाढ होवून, जलपातळी पूर रेषेकडे झेपाऊ लागल्याने दोन्ही नदि किनारच्या एकूण १६ गावांतील ग्रामस्थांना सतर्कता व दक्षतेचा ईषार देण्यात आला असल्याची माहिता रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे.
रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंबा नदिची जलपातळी नागोठणे केटी बंधाऱ्या जवळ ८ मिटर या पूररेषे पेक्षा वाढून ८.५० मिटर झाली आहे.तर कुंडलिका नदिची जलपातळी रोहा येथे २३.९० मिटर झाली आहे. कुडलिका नदिची रोहा येथील पूर सिमा २३.९५ मिटर आहे. झपाट्याने वाढणाऱ्या जलपातळीच्या पाश्वर्भूमीवर रोहा तहसिलदार कार्यालयाच्या माध्यमातून आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचेही पाठक यांनी पूढे सांगीतले.
दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात जिल्ह्यात १७७.८० मिमी अशा सर्वाधिक पावसाची नोंद कर्जत येथे झाली आहे. जिल्हयात उर्वरित ठिकाणी पनवेल- १०५, अलिबाग-०२, पेण-१९.२०, मुरुड-०६, उरण-६.५०, खालापूर-५२, माणगांव-३३, रोहा-३३, सुधागड-४०, तळा-११, महाड-३५, पोलादपूर-३६,म्हसळा-२६.२०, श्रीवर्धन-१०, आणि गिरीस्थान माथेरान येथे १४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासातील जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४६.०१ मिमी आहे.
रविवारी सकाळी आठ वाजल्या पासून पूढील २४ तासात संपर्ण कोकणात अतिवृष्टीचा ईषारा हवामान खात्याने दिला आहे.तर सोमवार २६ जून २०१७ रोजी सकाळी नऊ वाजल्या पासून पूढील १२० तासात कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यास अनूसरुन जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगीतले.