राजनाला कालव्याला सोडले पाणी
By admin | Published: December 21, 2015 01:31 AM2015-12-21T01:31:30+5:302015-12-21T01:31:30+5:30
तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले
कर्जत : तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले जात नव्हते. यावेळी मुदतीत झीरो बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात राजनाला कालवा परिसरात भाताचे पीक घेतले जाईल अशी अपेक्षा आहे. पाणी पोटल कालव्याचे दुरु स्तीचे काम वनविभागामुळे अर्धवट असल्याने त्या भागात पाणी सोडले जाणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
१९६० च्या दशकात राजनाला कालवा तयार करण्यात आला, त्यावेळी २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येत होती. १९९० च्या दशकात शेतीसाठी पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहचत नव्हते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार शेती करण्याचे सोडून दिले होते. त्यातच राजनाला कालव्याची दुरु स्ती करण्याची तरतूद पाटबंधारे खात्याकडे नसल्याने शेतकरी कालव्यात पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा साफकरून शेतीसाठी पाणी घेत. मात्र अनेक ठिकाणी कालवा, पोटकालवे फुटून तर त्यांना मोठ्या खांडी पडून लावलेल्या शेतीचे नुकसान होत असे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने २०११ मध्ये राजनाला कालव्याच्या दुरु स्तीचा आणलेला प्रस्ताव मान्य करीत एक वर्षासाठी शेती न करता कालव्याच्या दुरु स्तीला परवानगी दिली होती. मात्र दोन वर्षे झाली तरी कालव्याचे काम पूर्ण होत नसल्याने शेतकरी दुबार शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आक्र मक झाले.
यावर्षी राजनाला भागातील सर्व गावातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आग्रह होता. त्यासाठी शेतकरी समितीच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी नाना गांगल, तानाजी चव्हाण, शिवाजी देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे राजनाला कालव्यात पाणी सोडण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे १७ डिसेंबरला राजनाला कालव्याच्या भिवपुरी येथील झीरो बंधारा येथे पाणी सोडण्यात आले. (वार्ताहर)