एसीबी चौकशी म्‍हणजे राजन साळवी यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्‍न - अनुजा साळवी

By राजेश भोस्तेकर | Published: April 18, 2023 07:57 PM2023-04-18T19:57:18+5:302023-04-18T19:57:48+5:30

साळवी  कुटुंबाची अलिबागच्या एसीबी कार्यालयात आठ तास चौकशी, बुधवारी पुन्हा होणार कुटुंबाची चौकशी

Rajan Salvi News: ACB probe is an attempt to blackmail Rajan Salvi - Anuja Salvi | एसीबी चौकशी म्‍हणजे राजन साळवी यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्‍न - अनुजा साळवी

एसीबी चौकशी म्‍हणजे राजन साळवी यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्‍न - अनुजा साळवी

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग : ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाची लाच लुचपत विभागाकडून मंगळवारी चौकशी करण्यात आली. यावेळी स्‍वतः आमदार साळवी, त्‍यांच्‍या पत्‍नी अनुजा, भाऊ दीपक , साळवी यांची दोन मुलं शुभम आणि अथर्व तसेच सीए श्रीरंग वैद्य हे आज चौकशीसाठी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात हजर राहिले आहेत. साळवी कुटुंबाची आठ तास चौकशी केली असून आज पुन्हा लाच लुचपत विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. याआधी राजन साळवी यांची तीन वेळा लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. तर त्याचे स्विय सहाय्यक याचीही चौकशी करण्यात आली होती. तर आता कुटुंबही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. जेवढी चौकशी करायची आहे तेवढी करा यासाठी आम्ही तयार आहोत असे राजन साळवी यांनी म्हटले आहे. 

आमदार राजन साळवी याची मालमत्तेबाबत रायगड लाच लुचपत विभागामार्फत गेली पाच महिन्यापासून चौकशी सुरू आहे. मंगळवारी १८ एप्रिल रोजी साळवी याच्या कुटुंबाची चौकशी सुरु झाली आहे. राजन साळवी यांच्या पत्नी, मुलगा,भाऊ आणि सीए याची चौकशी अलिबाग कार्यालयात अधिकाऱ्यांनी केली.

एसीबी चौकशी म्‍हणजे राजन साळवी यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्‍न असल्‍याचा आरोप त्‍यांच्‍या पत्‍नी अनुजा साळवी यांनी केलाय. असे असले तरी आम्‍ही चौकशीला सामोरे जावू असंही त्‍यांनी म्‍हटलंय. ठाकरे गटाचे आमदार राजन  साळवी यांची पाच महिन्‍यांपासून एसीबी चौकशी सुरू आहे. मंगळवारी आमदार साळवी यांची सहकुटुंब चौकशी सुरू झाली आहे. स्‍वतः आमदार साळवी, त्‍यांच्‍या पत्‍नी अनुजा, भाऊ दीपक , साळवी यांची दोन मुलं शुभम आणि अथर्व तसेच सीए श्रीरंग वैद्य हे आज चौकशीसाठी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात हजर राहिले आहेत. 

मी सर्व चौकशीला सामोरा जातो आहे, सर्व प्रकारची माहिती दिली तरीदेखील त्यांचे समाधान होत नाही त्यांना किती चौकशी करायची आहे ती करुद्या आम्हाला फरक पडणार नाही .एवढं मात्र नक्की आहे की या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही असे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले. बुधवारी देखील साळवी कुटुंबीयांची चौकशी होणार आहे.

आज दिवसभर आमच्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींची चौकशी करण्यात आली. एसीबीने विचारलेली सर्व माहिती आम्ही त्यांना दिली आहे. तरीदेखील काही चौकशी अपुरी आहे . उद्या पुन्हा चौकशी होईल. उद्याच्या चौकशी नंतर पुन्हा मला या कार्यालयात यावे लागणार नाही , अशी अपेक्षा आहे.

आ. राजन साळवी

Web Title: Rajan Salvi News: ACB probe is an attempt to blackmail Rajan Salvi - Anuja Salvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.