पनवेलमध्ये 31 डिसेंबरच्या निमित्ताने संदेशात्मक देखावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:00 AM2018-12-31T10:00:04+5:302018-12-31T10:20:00+5:30

पनवेलमधील सुकापूर येथील राकेश चंद्रकांत केणी (25) या तरूणाने एक उत्तम संदेश देणारा देखावा उभारला आहे. पनवेल परिसरात असलेला हा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

rakesh keni social message 31st December Panvel | पनवेलमध्ये 31 डिसेंबरच्या निमित्ताने संदेशात्मक देखावा

पनवेलमध्ये 31 डिसेंबरच्या निमित्ताने संदेशात्मक देखावा

Next
ठळक मुद्देपनवेलमधील सुकापूर येथील राकेश चंद्रकांत केणी (25) या तरूणाने एक उत्तम संदेश देणारा देखावा उभारला आहे.पनवेल परिसरात असलेला हा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.हेल्मेट शिवाय दूचाकी चालवू नका अशाप्रकारचा संदेशात्मक देखावा उभारण्यात आलेला आहे.

वैभव गायकर

पनवेल - 31 डिसेंबर म्हटलं की पार्टीचे बेत आखले जातात. सर्वत्र सेलिब्रेशन केले जाते. मात्र या दिवशी आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काही घटनाही घडत असतात. याकरीता पनवेलमधील सुकापूर येथील राकेश चंद्रकांत केणी (25) या तरूणाने एक उत्तम संदेश देणारा देखावा उभारला आहे. पनवेल परिसरात असलेला हा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

देखाव्यात 31 सेलिब्रेशनच्या निमित्ताने मद्यपान केल्याने अनेक अपघात घडत असतात. तसेच वाहन चालक मद्यपान करून अपघाताला निमंत्रण देतो. विशेष म्हणजे सध्या एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. सेलिब्रेशनसाठी आणलेला केक हा खाण्यापेक्षा एकमेक्यांच्या चेहऱ्यावर अधिक फासला जातो. मोठया प्रमाणात अन्नाची नासाडी केली जाते. असे न करता तेच अन्न किंवा केक गरिबांना वाटप करून नवीन वर्षाचे स्वागत करा अशाप्रकारचे संदेश देणारे फलक लावून जनजागृती केली जात आहे.

हेल्मेट शिवाय दूचाकी चालवू नका अशाप्रकारचा संदेशात्मक देखावा उभारण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचे देखावे पोलीस ठिकठिकाणी उभारून नागरिकांना सतर्क करत असतात. मात्र राकेश चंद्रकात केणी या तरूणाने उभारलेला देखावा खरोखरच कौतुकास्पद आहे.

Web Title: rakesh keni social message 31st December Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल