कर्जत : तहसील कार्यालयातील पुरवठा निरिक्षण अधिकारी हे पद वर्षभरापासून रिक्त असल्याने सामान्य नागरिकांना पुरवठा विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा मिळण्यास मनस्ताप सहन करावा लागत आहे. विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभासाठी तसेच रेशनकार्डसंबंधी किरकोळ कामांकरताना वृद्ध, विधवा महिला, निराधार व्यक्ती, अंध, अपंग, शालेय विद्यार्थी यांना महिनाभर विनाकारण तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. अगोदरच कर्जत तहसील कार्यालय उंच डोंगरावर असल्यामुळे वृद्धांना व महिलांना डोंगरावरील कार्यालयात चढ उतार करु न येणे - जाणे त्रासदायक आहे. संबंधित प्रशासनाने लवकर कर्जत तहसील कार्यालयातील रिक्त पुरवठा अधिकारी हे पद भरु न सर्व सामान्य जनतेला होणारा त्रास कमी करावा अशी मागणी आंतरराष्टी्रय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.
तहसीलचा कारभार राम भरोसे
By admin | Published: January 24, 2017 5:58 AM