मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 11:34 PM2019-05-25T23:34:10+5:302019-05-25T23:34:20+5:30

मुरुड तालुक्याला जवळपास अडीच किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

Ram Burrowsa protects tourists on Murud Beach | मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे

मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे

Next

- गणेश चोडणेकर 
आगरदांडा : मुरुड तालुक्याला जवळपास अडीच किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. काशीद, किहीम, नायगाव, मुरुड या ठिकाणी दरवर्षी पाच लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक येत असले तरी किनारी भागात सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना राबविण्यात न आल्याने पर्यटकांना जीव गमवावा लागत आहे.
नारळ-पोकळीच्या बागा, विस्तीर्ण समुद्रकिनारे, सुरुची वने आदीमुळे हा परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. किनारी भागात स्पीड बोट, बनाना बोट, पॅराशूट सफारीची सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी काळजी न घेतल्याने शनिवारी एका पर्यटकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. २०१४ मध्येही पुणे येथील अबिद इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी पाण्यात पोहण्यात उतरले व १४ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर मुरुड येथील समुद्रकिनाºयावर टेहळणी मनोरे उभारण्यात आले. तर नगरपरिषदेकडून जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली; परंतु इतर कोणत्याही सुविधा येथे देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे किनारी भागात वारंवार दुर्घटना घडत आहे.
मुरुडमध्ये ग्रामीण रुग्णालय असून मनुष्यबळाचा अभाव, अद्ययावत साधन सामग्री नसल्याने अपघात घडल्यास पर्यटकाला अलिबाग येथे हलवावे लागते. मात्र, वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते.
तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठीही लाखो पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. त्यांची शिडाच्या बोटीतून वाहतूक केली जाते. मात्र, अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत घेतले जातात. या वेळी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजनांकडे लक्ष दिले जात नाही.
>पॅराशूट सफरीचा व्यवसाय तेजीत
महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसते. समुद्रात बेकायदा वाहन चालवून पॅराशूट सफरीचा व्यवसाय या ठिकाणी गेल्या चार- पाच वर्षात तेजीत आला आहे. यात पर्यटकांच्या सुरक्षेला बगल देण्यात येत असून बंदर निरीक्षकांकडूनही कारवाई होत नसल्याने हा व्यवसाय फोफावला आहे.
समुद्रात सकाळी व संध्याकाळी वॉकिंगसाठी व फिरण्यासाठी खूप पर्यटक येतात. हे माहीत असून किनारी भागात मुरुड नगरपरिषदेने चारचाकी वाहनांना बंदी घातलेली नाही. शनिवारच्या घटनेनंतर पॅराशूट व्यवसाय करणाºयाबरोबरच संबंधित अधिकाºयांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.मुरुड समुद्रकिनारी स्पीडबोट, बनाना बोट, पॅराशूट रायडिंग केले जाते. हौशीखातर पर्यटक या सफरीचा आनंद घेत असले तरी अनेकदा तो त्यांच्या जीवावर बेततो. अद्ययावत रुग्णालय नसल्याने पर्यटकांना वेळेवर उपचारही मिळत नाही.
>समुद्रात चालणाºया खेळासाठी आम्ही परवानगी देतो. मात्र, पाण्यात जाण्याआधी पर्यटकांना लाइफ जाकीट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच स्पोटर््स गेम्सचे लायसन्स घेणाºयांना सर्व बोटींवर एक उत्कृष्ट स्विमर नियुक्त करण्याचीही सक्ती केली आहे.
- हितेंद्र बारापत्रे, बंदर निरीक्षक, मुरुड

Web Title: Ram Burrowsa protects tourists on Murud Beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.