उमरठ-खोपड मार्गावर दरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:51 PM2019-07-09T22:51:51+5:302019-07-09T22:51:58+5:30
गाड्या अडकल्या : जेसीबीच्या साहाय्याने रस्ता के ला मोकळा
पोलादपूर : तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात उमरठ-खोपड मार्गावर मोरझोत धबधब्याच्या पुढे डोंगरालगतचा मातीचा ढिगारा खाली आल्याने या मार्गावर काही गाड्या अडकल्या होत्या, त्याचप्रमाणे वस्तीच्या बस गाड्या अडकल्याने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
सोमवारी तालुक्यात पावसाने जोरदार वर्षाव केला असून १०५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आजमितीस १२६७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्या झोतात उमरठ-खोपड मार्गावरील मोरझोत धबधब्याच्या पुढे डोंगरावरची माती दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास खाली आली असून, पोलादपूरकडे येणाऱ्या दोन रुग्णवाहिकांसह इतर काही गाड्या अडकून पडल्या होत्या. तर खोपडच्या पुढे जाणाºया वस्तीच्या एसटी गाड्या अडकल्या या घटनेची माहिती प्राप्त होताच बांधकाम खात्याचे पोलादपूर येथील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी जेसीबीच्या साहाय्याने माती बाजूला करून दोन-अडीच तासांच्या प्रयत्नानंतर रस्ता एका बाजूकडून खुला केला.
पावसाचा वेग जास्त असल्याने तसेच मातीचा ढिगारा उपसताना येणाºया अडचणी लक्षात घेत मंगळवारी सकाळी पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा काढण्यात आला. हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.