सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी लागल्या रांगा
By admin | Published: February 25, 2017 03:17 AM2017-02-25T03:17:20+5:302017-02-25T03:17:20+5:30
रसायनी परिसरातील गुळसुंदे येथील पाताळगंगा नदीकिनारी असलेले प्राचीन दाक्षिणात्य शैलीतील सिद्धेश्वराचे मंदिर असून
मोहोपाडा : रसायनी परिसरातील गुळसुंदे येथील पाताळगंगा नदीकिनारी असलेले प्राचीन दाक्षिणात्य शैलीतील सिद्धेश्वराचे मंदिर असून, महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात धार्मिक कार्यक्र माबरोबरच महाभिषेक, रु द्राभिषेक, स्तोत्रपठण असे कार्यक्र म पार पडले. महाशिवरात्रीचा दिवस हा महाउत्सव म्हणून ओळखला जात असल्यामुळे शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासून मोठ्या प्रमाणात रेलचेल पाहावयास मिळत होती.
गुळसुंदे येथील खेडेगावात असलेले दाक्षिणात्य शैलीतील सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर, काळ्या पाषाणातील सुंदर मंदिर असून, हेमाडपंथी दाक्षिणात्य शैलीत पूर्ण चुन्यामध्ये बांधलेले आहे. भव्य घाट, पुढे सभामंडप, दीपमाळ, आंतरभागात शिल्प, चौकटीवर वेलपती कमलाकारांची संकल्प रचना, भिंतीतच समई, दीपांसाठी महिरपी कोनाडे, भव्य नंदीशिल्प, बाहेरील पायऱ्यांजवळ यादव विजयाची प्रतीकरूप स्त्रीशिल्पे, समोरून वाहणारी पाताळगंगा नदी, पाताळगंगेचा रमणीय परिसर मनाला शांती आणि आनंद देणारा आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.