पनवेल : २१ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भाजपा आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पनवेलमधील पालेखुर्द येथे जाहीर सभा होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रामशेठ ठाकूर असतील. या वेळी भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जी. आर. पाटील, लक्ष्मण पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
रावसाहेब दानवे आज पनवेलमध्ये
By admin | Published: February 18, 2017 4:21 AM