रायगडावरील उत्खननात सापडली पुरातन मौल्यवान बांगडी, संभाजीराजेंना अत्यानंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:43 PM2021-04-02T17:43:03+5:302021-04-02T17:44:31+5:30
पुरातत्व विभागाच्या प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत.
रायगड - किल्ले रायगड हा संपूर्ण देशाचा अभिमान आहे. वनसंपदेनं परिपूर्ण या परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन सुरू आहे. येथील जमिनीवर यांत्रिक साधनांचा वापर करून उत्खनन केले जात आहे. या उत्खनान अनेक दुर्मिळ आणि प्राचीन काळातील वस्तू सापडत आहेत. रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व आज पुन्हा प्रत्ययास आले. कारण, येथील उत्खननात सोन्याची पुरातन बांगडी आढळून आली आहे.
पुरातत्व विभागाच्या प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याच्या धातूपासून बनवलेली पुरातन मौल्यवान बांगडी सापडली आहे. खुद्द खासदार संभाजीराजेंनीच यासंदर्भात माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन संभाजीराजेंनी या बांगडीचे फोटोही शेअर केले आहेत.
रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व आज पुन्हा प्रत्ययास आले.
प्राधिकरणामार्फत...
Posted by Yuvraj Sambhajiraje Chhatrapati on Friday, April 2, 2021
तसेच, यापुढेही अशाप्रकारे अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. त्यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्याठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे. सध्या गडावर सुरु असलेल उत्खनन भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने चालू आहे, आणि या उत्खननातच या वस्तू मिळत आहेत. या प्रसंगी पुरातत्व खात्याचे विशेष कौतुक करावे, असेही संभाजीराजे यांनी म्हटलंय.