दुर्मीळ गोरख चिंच वृक्षांना हवे अभय

By admin | Published: January 11, 2016 02:05 AM2016-01-11T02:05:33+5:302016-01-11T02:05:33+5:30

ग्लोबल वॉर्मिंगच्या लहरी हवामानात आजदेखील अनेक वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखत आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाओबाब अर्थात गोरख चिंच हा एक दुर्मीळ वृक्ष तीन

The rare Gorakh Chinchwar trees need Abhay | दुर्मीळ गोरख चिंच वृक्षांना हवे अभय

दुर्मीळ गोरख चिंच वृक्षांना हवे अभय

Next

मुरुड : ग्लोबल वॉर्मिंगच्या लहरी हवामानात आजदेखील अनेक वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखत आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाओबाब अर्थात गोरख चिंच हा एक दुर्मीळ वृक्ष तीन हजार वर्षांहून अधिक काळ तग धरून राहतो. अलौकिक अशी या वृक्षाची महती आहे. खोकरी येथील सिध्दी राज्यकर्त्यांच्या ३५० वर्षांपूर्वीच्या मकबऱ्याजवळ ६ दुर्मीळ गोरख चिंचेचे महाकाय वृक्ष आहेत. स्थानिकांकडून या दुर्मीळ वृक्षांचे संवर्धन व्हावे अशी मागणी होत आहे.
जंजिरा-मुरुड या ऐतिहासिक नगरीला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. प्रदूषणमुक्त मुरु डची हिरवाई, स्वच्छ सागरकिनारे, जंजिरा, पद्मदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. २२ एकर परिसरात पहुडलेला बेलाग जंजिरा वास्तुशास्त्राचा अजोड नमुना आहे. राजपुरीपासून जवळच असलेले खोकरीचे गुंबज मुगल आणि हिंदू स्थापत्य शिल्प शैलीचा मिलाप असलेले सिद्दीचे मकबरे आहेत. या दरम्यान अत्यंत दुर्मीळ ‘बाओबाब’ अर्थात गोरख चिंचेचे ६ महाकाय वृक्ष दिमाखात उभे आहेत. या वृक्षांचा बुंधा जाडसर छत्रीसारखा असणारा वरचाभाग हिरव्यकंच पानांनी आच्छादलेला असतो. वसंतऋतूत पालवी फुटते तर हिवाळ्यात झाडांची पानगळ होते.
रिकाम्या फांद्या अवकाशात चिकटल्यासारख्या वाटतात. या वृक्षाची फळे माकडं चवीने फस्त करतात म्हणून ‘मंकी ब्रेड ट्री’ असेही संबोधतात. ‘क’ जीवनसत्त्व या फळांपासून मिळते. बियांपासून खाद्यतेलही मिळू शकते. याशिवाय सालांपासून दोरखंड, चटया, टोपल्या, कागद आणि कापडही बनू शकते. वृक्षाची मुळे ही औैषधी गुणधर्मयुक्त असतात. संत गोरक्षनाथ याच वृक्षाच्या शीतल छायेखाली शिष्यगणांशी संवाद करीत असत अशी आख्यायिका आहे. बाओबाब या वृक्षाचे आर्युमान सुमारे ३ हजार वर्षांइतके असते. उंची १६ ते २९ मीटरपर्यंतची आहे. ही वृक्षे कमालीची मोहक वाटतात. भारतात हा आफ्रिकन वृक्ष इ.स.१६०० च्या सुमारास हबसाण व्यापाऱ्यांनी आणला असावा असा तर्क आहे. जंजिऱ्यावर सिद्दीने याच सुमारास चढाई करून पाऊल टाकले. अलीकडे झालेल्या पर्यावरण सर्वेक्षणात जगाच्या पाठीवर बाओबाब या वृक्षांची संख्या सुमारे २०० च्या घरात असून भारतात केवळ ५० वृक्षच अस्तित्वात आहेत. बाओबाब झाडांजवळ पर्यावरण विभागाकडून फलक लावल्यास पर्यटकांना याची माहिती होईल व या दुर्मीळ वृक्ष गोरखचिंचेचे गुणधर्म समजतील, अशी स्थानिकांची अपेक्षा असून या वृक्षांचे संवर्धन व्हावे, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: The rare Gorakh Chinchwar trees need Abhay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.