शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

दुर्मीळ गोरख चिंच वृक्षांना हवे अभय

By admin | Published: January 11, 2016 2:05 AM

ग्लोबल वॉर्मिंगच्या लहरी हवामानात आजदेखील अनेक वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखत आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाओबाब अर्थात गोरख चिंच हा एक दुर्मीळ वृक्ष तीन

मुरुड : ग्लोबल वॉर्मिंगच्या लहरी हवामानात आजदेखील अनेक वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखत आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाओबाब अर्थात गोरख चिंच हा एक दुर्मीळ वृक्ष तीन हजार वर्षांहून अधिक काळ तग धरून राहतो. अलौकिक अशी या वृक्षाची महती आहे. खोकरी येथील सिध्दी राज्यकर्त्यांच्या ३५० वर्षांपूर्वीच्या मकबऱ्याजवळ ६ दुर्मीळ गोरख चिंचेचे महाकाय वृक्ष आहेत. स्थानिकांकडून या दुर्मीळ वृक्षांचे संवर्धन व्हावे अशी मागणी होत आहे.जंजिरा-मुरुड या ऐतिहासिक नगरीला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. प्रदूषणमुक्त मुरु डची हिरवाई, स्वच्छ सागरकिनारे, जंजिरा, पद्मदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. २२ एकर परिसरात पहुडलेला बेलाग जंजिरा वास्तुशास्त्राचा अजोड नमुना आहे. राजपुरीपासून जवळच असलेले खोकरीचे गुंबज मुगल आणि हिंदू स्थापत्य शिल्प शैलीचा मिलाप असलेले सिद्दीचे मकबरे आहेत. या दरम्यान अत्यंत दुर्मीळ ‘बाओबाब’ अर्थात गोरख चिंचेचे ६ महाकाय वृक्ष दिमाखात उभे आहेत. या वृक्षांचा बुंधा जाडसर छत्रीसारखा असणारा वरचाभाग हिरव्यकंच पानांनी आच्छादलेला असतो. वसंतऋतूत पालवी फुटते तर हिवाळ्यात झाडांची पानगळ होते. रिकाम्या फांद्या अवकाशात चिकटल्यासारख्या वाटतात. या वृक्षाची फळे माकडं चवीने फस्त करतात म्हणून ‘मंकी ब्रेड ट्री’ असेही संबोधतात. ‘क’ जीवनसत्त्व या फळांपासून मिळते. बियांपासून खाद्यतेलही मिळू शकते. याशिवाय सालांपासून दोरखंड, चटया, टोपल्या, कागद आणि कापडही बनू शकते. वृक्षाची मुळे ही औैषधी गुणधर्मयुक्त असतात. संत गोरक्षनाथ याच वृक्षाच्या शीतल छायेखाली शिष्यगणांशी संवाद करीत असत अशी आख्यायिका आहे. बाओबाब या वृक्षाचे आर्युमान सुमारे ३ हजार वर्षांइतके असते. उंची १६ ते २९ मीटरपर्यंतची आहे. ही वृक्षे कमालीची मोहक वाटतात. भारतात हा आफ्रिकन वृक्ष इ.स.१६०० च्या सुमारास हबसाण व्यापाऱ्यांनी आणला असावा असा तर्क आहे. जंजिऱ्यावर सिद्दीने याच सुमारास चढाई करून पाऊल टाकले. अलीकडे झालेल्या पर्यावरण सर्वेक्षणात जगाच्या पाठीवर बाओबाब या वृक्षांची संख्या सुमारे २०० च्या घरात असून भारतात केवळ ५० वृक्षच अस्तित्वात आहेत. बाओबाब झाडांजवळ पर्यावरण विभागाकडून फलक लावल्यास पर्यटकांना याची माहिती होईल व या दुर्मीळ वृक्ष गोरखचिंचेचे गुणधर्म समजतील, अशी स्थानिकांची अपेक्षा असून या वृक्षांचे संवर्धन व्हावे, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)