गॅस पाइपलाइनमुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच मोबदला - रवींद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 03:23 AM2018-12-22T03:23:19+5:302018-12-22T03:23:38+5:30
रिलायन्स गॅस पाइपलाइन्स लिमिटेड कंपनीच्या ‘देहेन-नागोठणे’ ही इथेन पाइपलाइन ज्या शेतातून जात आहे, त्या शेतक-यांच्या मोबदल्यासंदर्भात तक्रार येत आहेत.
अलिबाग : रिलायन्स गॅस पाइपलाइन्स लिमिटेड कंपनीच्या ‘देहेन-नागोठणे’ ही इथेन पाइपलाइन ज्या शेतातून जात आहे, त्या शेतक-यांच्या मोबदल्यासंदर्भात तक्रार येत आहेत. त्याची दखल घेत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. येत्या १५ दिवसांत प्राधिकाºयांनी सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे आदेश चव्हाण यांनी दिले.
रिलायन्स कंपनीकडून पेण, खालापूर तालुक्यातील शेतकºयांना अदा केलेल्या मोबदल्याबाबत राजस्व सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, रिलायन्स गॅस पाइपलाइन प्रकल्पाचे सक्षम प्राधिकारी पांडुरंग मकदुम, पेण तहसीलदार अजय पाटणे तसेच रिलायन्स कंपनीचे राजेंद्र धड्डा, एस. जयचंद्रन, एल. कुमार्वेल, एस.डी. घोडके तसेच शेतकºयांचे नेते
विष्णू पाटील व सर्व शेतकरी उपस्थित होते.
भूसंपादनाबाबत ज्या शेतकºयांचे आक्षेप आहेत अशा व पाइपलाइनमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकºयांनी आपली कागदपत्रे सादर करावी, असे यावेळी सांगण्यात आले. येत्या १५ दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करु न प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले. यावेळी उपस्थित शेतकºयांनी समस्या मांडल्या.