आदरातिथ्याने सकल मराठा भारावला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:09 AM2017-08-10T06:09:25+5:302017-08-10T06:29:08+5:30

मराठा क्रांती मोर्चामध्ये नवी मुंबई, पनवेलकरांनी आदरातिथ्याची भूमिका बजावली. राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांची २० हजार वाहने उभी करण्यासाठी विशेष वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती.

The reception filled the gross Maratha |  आदरातिथ्याने सकल मराठा भारावला 

 आदरातिथ्याने सकल मराठा भारावला 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चामध्ये नवी मुंबई, पनवेलकरांनी आदरातिथ्याची भूमिका बजावली. राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांची २० हजार वाहने उभी करण्यासाठी विशेष वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनासाठी आलेल्या हजारो नागरिकांना चहा, नाष्टा, जेवण, पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी स्वत:ला झोकून दिले होते. नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने सकल मराठा जनही भारावून गेले होते.
मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी होण्यामध्ये नवी मुंबई, पनवेलकरांची भूमिका महत्त्वाची ठरली. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद परिसरातून लाखो मराठा नागरिक आंदोलनासाठी मुंबईमध्ये धडकणार होते. सर्वच वाहने मुंबईमध्ये गेली तर प्रचंड वाहतूककोंडी होण्याची शक्यता होती. मुंबईमधील वाहतूक यंत्रणा कोलमडून त्याचा परिणाम जनजीवनावर व प्रत्यक्ष मोर्चावरही होण्याची शक्यता होती. यामुळे पोलीस प्रशासनाने कमीत कमी वाहने मुंबईमध्ये जावी यासाठी मोर्चाचे नियोजन करणाºया पदाधिकाºयांना आवाहन केले. मोर्चेकºयांनी त्यांनी वाहने खारघरमधील सेंट्रल पार्क, सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदान, एपीएमसीचे मसाला व कांदा - बटाटा मार्केट व वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभी करता यावी यासाठी विशेष वाहनतळांची व्यवस्था केली होती. प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांची वाहने कुठे उभी करायची याविषयीचेही नियोजन करण्यात आले. तब्बल २० हजार वाहने या वाहनतळांवर उभी करण्यात आली. सर्व नागरिकांनी हार्बर रेल्वेने मोर्चाच्या ठिकाणी जाण्यास पसंती दिली. याशिवाय शहरामधील नागरिकांनीही रेल्वे मार्गेच आझाद मैदानावर जाण्यास पसंती केली. दहा हजारपेक्षा जास्त माथाडी कामगार सानपाड्यावरून मोर्चाच्या ठिकाणी रवाना झाले. बीडमधून आलेल्या नागरिकांची सोय सानपाडा दत्तमंदिर परिसर, सातारा व कोल्हापूरमधून आलेल्या नागरिकांसाठी माथाडी भवन व एपीएमसीमध्ये सोय करण्यात आली.

वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी खारघर टोल नाका परिसरात ड्रोनचा उपयोग केला होता. या कॅमेºयाद्वारे नवी मुंबई आयुक्तालयात वाहतुकीच्या परिस्थितीची माहिती दिली जात होती.

६०० डॉक्टरांची टीम
नवी मुंबईमध्ये ६०० डॉक्टर व शेकडो स्वयंसेवकांची टीम वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कार्यरत होती. वाहनांची पार्किंग, चालकांना सूचना, वैद्यकीय सुविधा, मोर्चेकºयांना नाष्टा, पाणी पुरविण्याचे काम हे स्वयंसेवक सकाळपासून करीत होते.

आंदोलकांची शिस्तबद्धता
मराठा क्रांती मूक मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांनी कुठेही गोंधळ होणार नाही, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात होती. मोर्चासाठी निघताना ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणा दिल्यानंतर रेल्वेने प्रवास करताना व इतर ठिकाणी कोणत्याही घोषणा दिल्या जात नव्हत्या. माथाडी कामगारांनीही कांदा - बटाटा मार्केट ते सानपाडा स्टेशनपर्यंत घोषणा दिल्या, परंतु नंतर शांततेने मुंबईकडे मार्गक्रमण केले.

दोन दिवस राबले स्वयंसेवक
नवी मुंबईमध्ये आलेल्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास दोन हजार स्वयंसेवक दोन दिवस दिवस-रात्र परिश्रम घेत होते. वाहनतळाची जागा साफ करण्यापासून ते अल्पोपहार व जेवणासाठीच्या डीश, पत्रावळ्या उचलण्यापर्यंत सर्व कामे स्वयंसेवक स्वेच्छेने करत होते. वाहनांची किरकोळ दुरुस्तीसाठी मेकॅनिकचे पथकही तैनात करण्यात आले होते. रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टर, मोफत औषधोपचाराचीही व्यवस्था करण्यात आली.

एपीएमसीमध्ये विशेष सुविधा
आंदोलनासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी वगळता इतर सर्व मार्केट पूर्णपणे बंद होती. कांदा बटाटा व मसाला मार्केटमध्ये वाहने उभी करण्याची व चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था केली होती. मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी तब्बल दहा हजार नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. व्यापारी व माथाडी कामगारांनी परिश्रम घेतले.

वाशी टोलनाक्यावर वाहनांचे सुयोग्य नियोजन
मराठा क्रांती मोर्चासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या मोर्चेकºयांच्या वाहनांच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी नवी मुंबईवर आली होती. त्यानुसार रस्ते वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नाही किंबहुना वाहतूककोंडीची समस्या उद्भवणार नाही, या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी पुरेपूर नियोजन केले होते. विशेषत: मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया वाशी टोलनाक्यावर वाहनांची रखडपट्टी होणार नाही, या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली होती. त्यासाठी मुंबईकडे जाणाºया सर्वच वाहनांना जवळपास साडेतीन तास टोलमुक्त प्रवेश देण्यात आला. त्यामुळे टोलनाक्यावर कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी झाली नाही. वाहतूक विभागाच्या वाशी शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड हे आपल्या टीमसह स्वत: सकाळपासून टोलनाक्यावर तळ ठोकून होते. तर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी टोलनाक्याला भेट देवून वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला.

मदत कक्ष
रेल्वे स्थानकाबाहेर मदत कक्ष उभारून या माध्यमातून परगावाहून आलेल्या बांधवांना पुढील प्रवासासाठी मार्गदर्शन करण्यात आले. मदत कक्षात पाच ते सहा स्वयंसेवक कार्यरत होते. मदत कक्षांमध्येही प्रथमोपचार पेटी ठेवण्यात आली होती. मोर्चात सहभागी होणाºया नागरिकांना फळे, चहा-बिस्कीट आणि नाश्त्याचे वाटप करण्यात आले. या वेळी निर्माण होणारा कचरा त्वरित उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

शिवसैनिकांचाही मदतीचा हात
नवी मुंबई शिवसेनेच्यावतीने सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये वाहने उभी करणाºया आंदोलनकर्त्यांची पूर्ण जबाबदारी स्वीकारली होती. वाहने शिस्तबद्धपणे उभी करण्याबरोबर आंदोलनकर्त्यांना चहा, नाष्टा उपलब्ध करून देण्यात आला. मनपातील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाºयांनी दोन दिवस मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली. विजय माने, रंगनाथ औटी, काशिनाथ पवार व इतर पदाधिकाºयांनी विशेष परिश्रम घेतले. सानपाडा येथील वºहाड भवनसह इतर ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या निवासाची सोय शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

तरु णांचा उत्साह शिगेला
मोर्चासाठी तरु ण मोठ्या प्रमाणात एकवटले होते. आरक्षण मिळालेच पाहिजे, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणा देऊन मुंबईकडे रेल्वेतून रवाना झाले.

पारंपरिक संस्कृतीचे दर्शन
मोर्चात सहभागी होणाºया अनेक मोर्चेकºयांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा धारण केली होती. यामध्ये मावळ्यांची वेशभूषा धारण करणारे तरु ण मोठ्या संख्येने पाहावयास मिळाले.

मुंबईकडे जाणाºया सीएसएमटी रेल्वेमध्ये मराठा बांधवांची अलोट गर्दी होती. शिवकालीन मावळ्यांची वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा तसेच भगवे झेंडे हातात फडकवून हजारो तरु ण मोर्चात सहभागी झाले होते. कामोठेमध्ये कराडी समाज हॉल, सद्गुरू वामनराव पै नामस्मरण केंद्रात मोर्चेकºयांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मराठा समाजावर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. विशेष करून शिक्षणाच्या बाबतीत इच्छा असून समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मराठा समाजाला आज खरोखरच आरक्षणाची गरज असून त्यासाठी आम्ही लाखोंच्या संख्येने एकत्र आलो आहोत. ते न मिळाल्यास सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभे राहील.
- रामचंद्र माने, पुणे

कोपर्डीसारखी घटना वारंवार घडू नये, याकरिता आरोपींना लवकरात लवकर फाशी देणे गरजेचे आहे. आजच्या नवीन पिढीला आरक्षणामुळेच शिक्षणात मागे राहावे लागले आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक निकषावर तरी आरक्षण देणे गरजेचे आहे. असे न झाल्यास गरजू सर्वसामान्य भरडला जाणार आहे.
- डॉ. प्रमोद आमृले, मोर्चात सहभागी झालेला उच्चशिक्षित तरु ण

मोर्चेकºयांना नाष्टा-पाण्याची व्यवस्था
खारघर, मानसरोवर, खांदेश्वर या रेल्वे स्थानकाबाहेर मोर्चासाठी मुंबईकडे वाटचाल करणाºया हजारो मराठा बांधवांना मोफत नाष्टा-पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर स्थापन केलेल्या मदत कक्षाद्वारे यावेळी मोर्चेकºयांना आवश्यक सूचना देण्यात येत होत्या.

मोबाइल टॉयलेटची व्यवस्था
मोर्चेकºयांच्या व्यवस्थेसाठी पार्किंगच्या ठिकाणी व शहरातील महत्त्वाच्या भागात मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती. ३0 ते ४0 मोबाइल टॉयलेट यावेळी शहरातील विविध भागात ठेवण्यात आले होते.

पोलिसांच्या नोंदणीनुसार पाच हजारांपेक्षा अधिक वाहने खारघरच्या टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहने व खाजगी बसचा समावेश होता. अतिशय नियोजनबद्ध मोर्चामुळे कोठेही वाहतूककोंडीची समस्या उद्भवली नाही.

 

Web Title: The reception filled the gross Maratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.