अलिबाग : जिल्ह्यातील युवकांना स्थानिक भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, अपरंपरागत व्यवसाय, उपलब्ध नैसर्गिक संसाधने आदींच्या आधारे विविध क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत २ कोटी २२ लाख रुपयांच्या कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यास शुक्रवारी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस.जी. पवार यांनी हा आराखडा सादर केला.बँकिंग अॅण्ड अकाऊंटिंग, सीएनसी आॅपरेटर, बांधकाम क्षेत्र, वाहतूक आणि पर्यटन, माल वाहतूक, माल साठवणूक व पॅकिंग, फॅब्रिकेशन अशा विविध व्यवसायांच्या ५०० हून अधिक वर्गातून, एकूण ३३५० तास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती या वेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस.जी. पवार यांनी दिली. जिल्ह्यात याच व्यवसायांशी संबंधित ८ कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था कार्यरत असून वर्षभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. यात काही निवासी प्रशिक्षणे राहाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.या प्रशिक्षणात सागरी किनारपट्टीवर प्रशिक्षित जीवरक्षक, तसेच नारळाच्या काथ्यांपासून वस्तू निर्मिती आदी प्रशिक्षणांचाही समावेश करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका मृ.न.देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यातील आजारी उद्योगांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुनर्वसन कार्यक्र म मंजूर करण्यासाठी आजारी उद्योगांच्या एकत्रित माहितीचा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राने सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारीच झालेल्या जिल्हा उद्योग मित्र व सल्लागार समितीच्या बैठकीत दिले आहेत. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील एमआयडीसीच्या समस्या जाणून घेतल्या. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी आणि जिल्हा कौशल्य विकास केंद्र या तीनही विभागांनी एकत्रित प्रयत्न करु न जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील स्थानिक तरु णांना योग्य कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचनाही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केली.>एमआयडीसीतील विविध समस्यांचा आढावाजिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबागयांचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील विविध योजनांतर्गत झालेल्या कामकाजाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. देशमुख यांनी एमआयडीसीतील विविध समस्यांबाबत माहिती यावेळी सादर केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृ.न.देशमुख, तसेच उद्योग मित्र समितीचे सदस्य अनिल खानापूरकर, महादेव पाटील, अशोक पाटील, सतीश चव्हाण, महेश गोराडे, निजर फोफलूनकर आदी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या अग्निशमन यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल आदी विविध विभागांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
२ कोटी २२ लाखांच्या आराखड्याला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 3:35 AM