१८ दिवसांत १०० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम

By admin | Published: September 30, 2016 04:02 AM2016-09-30T04:02:27+5:302016-09-30T04:02:27+5:30

ग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणेही अनेकदा परवडणारे नसते. ग्रामीण भागातील वाढते दृष्टिदोष कमी करण्यासाठी केवळ सामाजिक बांधिलकीच्या हेतूने

Record of 100 Free Cataract Surgeries in 18 Days | १८ दिवसांत १०० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम

१८ दिवसांत १०० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम

Next

- जयंत धुळप,  अलिबाग
ग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणेही अनेकदा परवडणारे नसते. ग्रामीण भागातील वाढते दृष्टिदोष कमी करण्यासाठी केवळ सामाजिक बांधिलकीच्या हेतूने अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशनने चौंढी येथे उभारलेल्या मोतीबिंदू नेत्रचिकित्सा रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांना १२ सप्टेंबर रोजी प्रारंभ केला. गेल्या १८ दिवसांत तब्बल १०० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अलिबाग येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशनची स्थापना लायन्स क्लब आॅफ अलिबाग, लायन्स क्लब मांडवा, लायन्स क्लब पोयनाड, लायन्स क्लब चौल-रेवदंडा, लायन्स क्लब आॅफ चेंबूर डायमंड या पाच लायन्स क्लबने हा उपक्रम राबवला आहे. यासाठी लायन्स फाऊंडेशनला लायन्स इंटरनॅशनल, अमेरिकेतील हेल्प मी सी, हाजी बच्चुअली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या सेवाभावी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशनने अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग असलेले सुसज्ज मोतीबिंदू चिकित्सा रुग्णालय उभारले असून रायगड जिल्ह्यातून मोतीबिंदू हद्दपार करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिली आहे.
चोंढी येथील मोतीबिंदू नेत्रचिकित्सा रुग्णालयात ४२१ रुग्णांची नेत्र तपासणी केली. त्यातील मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारपर्यंत एकूण १०३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

Web Title: Record of 100 Free Cataract Surgeries in 18 Days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.