सात एकरमध्ये विक्रमी पीक; माले येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:17 AM2019-06-07T00:17:45+5:302019-06-07T00:17:54+5:30

आपल्या शेतात अनेक प्रयोग करून यशस्वी शेती केल्याने त्यांना २०१३ साली कृषी विभागाकडून कृषिनिष्ठ प्रगत शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.

Record crop in seven acres; Successful use of farmer in Male | सात एकरमध्ये विक्रमी पीक; माले येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

सात एकरमध्ये विक्रमी पीक; माले येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

googlenewsNext

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील माले येथील शेतकरी अरुण वेहेले यांनी आपल्या सात एकर शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. यावर्षी त्यांनी चार एकरमध्ये कोहळा, तर तीन एकरमध्ये डांगराची शेती करून विक्रमी पीक घेतले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणाºया शेतकऱ्यांमध्ये अरुण वेहेले हे नेहमीच आघाडीवर राहिले असून, कोहळा आणि डांगराच्या पिकातून मोठा नफा मिळाला आहे.
माले गावातील अरुण वेहेले हे गेल्या २० वर्षांपासून शेती व्यवसाय करत आहेत. त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या शेतात अनेक प्रयोग करून यशस्वी शेती केल्याने त्यांना २०१३ साली कृषी विभागाकडून कृषिनिष्ठ प्रगत शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.

कृषी विभागातील अनेक योजनांचा ते लाभ घेत आहेत. त्यांनी शेतात अनेक प्रकारची भात पिके घेतली आहेत. त्यांनी केलेली शेती पाहून परिसरातील अनेक शेतकरी शेती विषयी माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात. भात शेतीनंतर ते उन्हाळ्यात आपल्या शेतात ठिबक सिंचन पद्धतीने काकडी, दुधी, टोमॅटो, चवळी, शिरोली, कारली, भेंडी, गवार अशी अनेक प्रकारची भाजीपाला पिके घेत आहेत. यासाठी त्यांना वार्षिक ६० ते ७० हजार रुपये खर्च येत असून, त्यापासून त्यांना एक ते दीड लाख रुपये नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या शेतात हापूस आंबा, केसरी, राजापुरी ही आंब्याची पिकेही घेतात.

यावर्षी त्यांनी आपल्या शेतात साळोख धरणाच्या पाण्यावर सात एकरमध्ये कमी खर्च येणारे पीक म्हणजे डांगर आणि कोहळ्याची लागवड केली आहे. यासाठी त्यांना २० हजार रुपयांचे बियाणे, २० हजार औषधे, १५ हजार खत, मजूर व इतर खर्च दहा हजार असा सुमारे ६० ते ६५ हजार रुपये खर्च आला आहे. पीक तयार झाले असून ते पूर्ण पीक कल्याण येथील बाजारपेठेत नेत असतात. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात, त्यांना डांगर आणि कोहळ्यापासून आठ लाखांहून अधिक नफा झाला आहे.

Web Title: Record crop in seven acres; Successful use of farmer in Male

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.