जेएनपीए बंदरातून २०२०-२३ या आर्थिक वर्षात ६०.०५ दशलक्ष कंटेनर मालाची विक्रमी हाताळणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:47 PM2023-04-03T17:47:44+5:302023-04-03T17:52:41+5:30
जेएनपीए बंदराअंतर्गत असलेल्या पाचही बंदराने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात कंटेनर मालाची हाताळणी केलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी सोमवारी ( ३) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए बंदराने २०२२- २०२३ या आर्थिक वर्षात ६०.०५ दशलक्ष कंटेनर मालाची हाताळणी केली आहे.मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी ६.४ टक्के वाढ झाली असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.
जेएनपीए बंदराअंतर्गत असलेल्या पाचही बंदराने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात कंटेनर मालाची हाताळणी केलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी सोमवारी ( ३) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला जेएनपीए बंदराचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयवंत ढवळे, मार्केटिंग मॅनेजर अंबिका सिंग तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना माहिती देताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी देशातील एकूण बंदरातील जेएनपीएने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ६०.०५ दशलक्ष कंटेनर मालाची विक्रमी हाताळणी केली आहे.यामध्ये बीएमसीटी -१७ लाख १४ हजार २४६(टीईयुस) ,एनएसआयसीटी-१८ लाख ४६ हजार ९२०(टीईयुस), एपीएमटी--११ लाख ३७ हजार ०३४ (टीईयुस) , एनएसआयजीटी- ०२ लाख ०५ हजार ९०७ (टीईयुस) , जेएनपीसीटी- ४९ हजार ७०७ (टीईयुस) आदी बंदरांचा समावेश असल्याचे सेठी यांनी सांगितले.
जेएनपीए बंदरातुन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात कंटेनर मालाची हाताळणी केलेली वाहतूक विक्रमी आहे.याची नोंद रेकॉर्ड बुकात लवकरच होणार आहे.
या अनाकलनीय यशाची बातमी शेअर करताना सेठी यांनी आनंद व्यक्त केला.जेएनपीए बंदर एक्झिम व्यापारासाठी एक परिपूर्ण बंदर बनवण्याची आमची वचनबद्धता सिद्ध करते. बंदरातील ग्राहकांना सर्वोत्तम सातत्यपूर्ण सेवा देण्याच्या प्रयत्नांचे आणि वचनबद्धतचे हे प्रतीक आहे. जेएनपीएवर विश्वास ठेवल्याबद्दल सर्व भागीदार आणि भागधारकांचे आभार व्यक्त करतानाच जेएनपीए देशाच्या आर्थिक विकासाचा मार्ग कायम राखण्यासाठी आपल्या भमिूकेसाठी वचनबद्ध आहे.”अशी ग्वाहीही जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.यावेळी केक कापून यशाचा आनंद साजरा करण्यात आला.