रायगडमध्ये साडेतीनशे रु ग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:20 IST2020-08-03T00:19:55+5:302020-08-03T00:20:17+5:30
रविवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १३९, पनवेल ग्रामीणमध्ये ४९, उरण १४, अलिबाग २१, कर्जत २५, पेण ३७, महाड ६, खालापूर २८, माणगाव ११, रोहा ११, श्रीवर्धन ६, म्हसळा ३ असे एकूण ३५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

रायगडमध्ये साडेतीनशे रु ग्णांची नोंद
पनवेल : पनवेल त्रायगड जिल्ह्यात रविवारी २ आॅगस्ट रोजी ३५० नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या १५ हजार ५०९ वर पोहोचली आहे. त्यापैकी १२ हजार २५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रविवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १३९, पनवेल ग्रामीणमध्ये ४९, उरण १४, अलिबाग २१, कर्जत २५, पेण ३७, महाड ६, खालापूर २८, माणगाव ११, रोहा ११, श्रीवर्धन ६, म्हसळा ३ असे एकूण ३५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दिवसभरात पनवेल मनपा ८९, पनवेल ग्रामीण ६५, उरण ७, खालापूर ३८, कर्जत ९, पेण २४, अलिबाग १९, माणगाव १६, रोहा ६, श्रीवर्धन ३, महाड १८ आणि पोलादपूर १ असे एकूण २९५ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत बाधितांपैकी १२ हजार २५२ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर ४३३ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३,२५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.