उरण : जेएनपीटी बंदरात परदेशातून एसी घेऊन आलेल्या कंटेनरमधून १५ किलो सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत पाच कोटींच्या आसपास आहे. न्हावाशेवा कस्टम विभागाने ही कारवाई केली. या प्रकाराने पुन्हा एकदा उरणचे जेएनपीटी बंदर तस्करांसाठीचा अड्डा ठरत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.हा कंटेनर नवघर गावाजवळ जीडीएल नावाच्या गोदामात तपासला असता, त्यात एसीच्या बॉक्समध्ये सोने लपविले असल्याचे समोर आले. ही कारवाई करीत असताना गोदामातील सर्व कामगारांना येण्यास मज्जाव केला होता. तर गोदामाच्या गेटवरून पत्रकारांनाही गोदामात जाण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र, कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिफर कंटेनरमध्ये असलेल्या खोक्यामध्ये हा माल मिळाला असल्याची माहिती मिळाली.उरण जेएनपीटी बंदर हे सातत्याने तस्करी प्रकरणांमुळे गाजत आले आहे. यापूर्वी या बंदरातून दुबईला जाणाºया कंटेनरमध्ये रक्तचंदन असल्याचे समोर आले आहे.कोप्रोलीच्या एका गोदामात ग्रीसमध्ये रिव्हॉल्व्हर आणण्यात आले होते. तर मध्यंतरी एका गोदामात लाकडी फर्निचरमध्ये नशेची पावडरही पकडण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर बंदरातील स्कॅनिंग मशिनची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे.१५ किलो सोनेयाबाबत न्हावाशेवा सीमाशुल्क अधिकाºयांकडून सांगण्यात आले की, १५ किलो सोने सापडले आहे. याबाबत अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, या प्रकरणी सखोलचौकशी सुरू करण्यात आली आहे. याची किंमत पाच कोटींच्या आसपास आहे.जीडीएल नावाच्या गोदामात सिंगापूरमधून एसी घेऊन आलेल्या या कंटेनरमध्ये लपवून आणलेले १५ किलो सोने हस्तगत करण्यात आले.
कंटेनरमध्ये कोट्यवधींचे सोने, न्हावाशेवा सीमाशुल्क विभागाची जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 7:02 AM