हवामान शास्त्र विभागात ११०२ वैज्ञानिक सहाय्यक पदांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:58 AM2017-08-12T05:58:46+5:302017-08-12T06:33:58+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभाग या केंद्र सरकारच्या देशभरातील कार्यालयांमध्ये ‘वैज्ञानिक सहाय्यक’ या पदाच्या एकूण ११०२ जागा स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरण्यात येणार असून, या पदासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत १४ आॅगस्ट आहे.
मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभाग या केंद्र सरकारच्या देशभरातील कार्यालयांमध्ये ‘वैज्ञानिक सहाय्यक’ या पदाच्या एकूण ११०२ जागा स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरण्यात येणार असून, या पदासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत १४ आॅगस्ट आहे. वैज्ञानिक सहाय्यक हे पद यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने भरले जाणार आहे. या पदाची शैक्षणिक अर्हता विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र प्रथम वर्ग पदवीधारक अशी आहे. वैज्ञानिक सहाय्यक हे क्लास बी (अराजपत्रित) दर्जाचे पद असून, या पदासाठी सध्याच्या वेतनश्रेणीनुसार दरमहा ४० हजार रुपये एवढे वेतन प्राप्त होते. केंद्र सरकारच्या भत्त्यांसह इतर सेवा सुविधाही मिळतात.
वैज्ञानिक सहाय्यक हे पद भारतीय हवामान शास्त्र विभागात पदार्पणाचे पद आहे. या पदावर भरती झाल्यानंतर विभागातर्फे हवामानशास्त्राविषयी प्रशिक्षण दिले जाते. वैज्ञानिक सहाय्यक म्हणून पात्र उमेदवाराची ज्या क्षेत्रात नेमणूक झाली असेल त्याप्रमाणे संबंधिताला ‘आॅन जॉब टेÑनिंग’ दिले जाते. विशेष बाब म्हणून परदेशातही प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. अंटार्टीका येथे संशोधनाची संधी उपलब्ध होते. निवड झाल्यानंतर येथे चालणाºया विविध स्वरुपाच्या कार्यापैकी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी आणि अनुभव प्राप्त करता येतो. यासंदर्भातील अधिक माहिती इच्छूकांना ँ३३स्र://२२ू.ल्ल्रू.्रल्ल या लिंकवर विस्तृतरित्या प्राप्त होईल.
भारतीय हवामान शास्त्र विभागाची स्थापना १८७५ साली झाली. कोलकाता येथे स्थापन झालेल्या या विभागाची व्याप्ती कालांतराने देशभर पसरली. देशभरातील सात प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राच्या अंतर्गत एकूण ८०० वर कार्यालये आहेत. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र-मुंबई हे यापैकी एक प्रमुख हवामानशास्त्र केंद्र आहे. एका प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्रांतर्गत निवड झाल्यानंतर दुसºया केंद्रात विनंतीशिवाय बदली होत नाही. भारतीय हवामान शास्त्र विभाग हे जागतिक हवामान शास्त्र संघटनेशी संलग्न असल्याने जगातील इतर हवामानशास्त्र विभागाशी संबंधित ज्ञानाची देवाणघेवाण होते.
राज्यातील स्थानिकांना विशेषत: मराठी युवकांना या विभागाबद्दल फारशी माहिती नाही. परिणामी उदासीनतेमुळे चार वर्षांपूर्वी वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी झालेल्या भरतीमध्ये एकाही मराठी युवकाची निवड झाली नव्हती.
किंबहुना राज्यातून एकही उमेदवार निवडला गेला नाही; कारण मुळातच परिक्षेला बसणारेच संख्येने कमी होते. परिणामी यावेळी अधिकाधिक मराठी उमेदवारांनी यासाठी प्रयत्न करावेत, असे कुलाबा वेधशाळा येथील स्थानिक लोकाधिकार समितीचे सरचिटणीस यशवंत साटम यांनी सांगितले.