शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

जेएनपीटीतील भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये प्रकल्पग्रस्तांची भरती

By admin | Published: May 20, 2017 4:38 AM

नव्याने सुरू होत असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) कामगार भरती भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांमधूनच केली जाणार आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कउरण : नव्याने सुरू होत असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) कामगार भरती भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांमधूनच केली जाणार आहे. २०१७ च्या अखेरीस पूर्णत्वास जाणाऱ्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात १०० तर दुसऱ्या टप्प्यात २०० प्रकल्पग्रस्तांची भरती केली जाणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये पहिल्यांदाच आॅनलाइन कामगार भरती प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या ७०० पेक्षा अधिक प्रकल्पबाधित भूमिपुत्र उमेदवार पहिल्या १०० जागांसाठी पात्र ठरले आहेत. आता आॅनलाइन नोकरभरतीमध्ये अर्जासाठी उमेदवारांना दलालांना पैसे देण्याची गरज भासणार नाही. यासाठी उमेदवारांनी थेट वेबसाईटवर त्यांचा अर्ज अपलोड करण्याच्या सूचना प्रकल्पाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच प्रकल्पबाधितांना नोकरी मिळण्याची खातरजमा करण्यासाठी भारत मुंबई कंटेनर टर्मिनलने अर्जातील कमाल वयाची मर्यादा जेएनपीटीच्या इतर टर्मिनलमधील असलेली २५ वर्षांची मर्यादा ३० वर्षापर्यंत वाढविली आहे. प्रकल्पातील बहुतांश कामे तांत्रिक पद्धतीने होणार असल्याचे उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता पदवी किंवा टेक्निकल डिप्लोमापर्यंत ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील भरती होणाऱ्या १०० जागांपैकी ७५ जागा इक्वीपमेंट आॅपरेटर आणि २५ जागा टेक्निशियनसाठी असणार आहेत. नोकर भरतीमध्ये रुजू होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पामार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.भारत मुंबई कंटेनर टर्मिनल हे भविष्यात देशातील सर्वात मोठे टर्मिनल असणार आहे. यामुळे विविध समभागधारकांच्या माध्यमातून आसपासच्या भागात दोन हजारांहून अधिक लोकांसाठी अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. यामध्ये ट्रक ड्रायव्हर्स, टॅलीमेन, एजंट्स आणि क्लरीकल स्टाफ अशा कामगारांचा समावेश असेल. यातील अनेक कामांमध्ये पदवीची गरज भासणार नसल्याचा दावाही प्रकल्पाच्या अधिकृत सूत्रांची केला.भारत मुंबई कंटेनर टर्मिनलतर्फे जवाहरलाल बंदरावर चौथे कंटेनर टर्मिनल उभारण्यात येत आहे. भारत मुंबई कंटेनर टर्मिनल हा बंदर प्रकल्प क्षेत्रातील पब्लिक- प्रायव्हेट- पार्टनरशिप (पीपीपी) मधील सर्वात मोठी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. या टर्मिनलची उभारणी २०१५ मध्ये सुरू करण्यात आली आहे. २०१७ या वर्षाच्या अखेरीस या प्रकल्प पूर्णत्वास जावून कामकाज सुरु होणार आहे. - जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती करणारी फॉक्सकॉन कंपनी आगामी काळात जेएनपीटीच्या स्पेशल इकॉनॉमिक्स झोनमध्ये (सेझ) उत्पादन केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. जगभरात जेएनपीटीची ओळख आणखी दृढ होण्यास हातभार भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या प्रकल्पामुळे लागणार असल्याचा दावाही प्रकल्पाकडून केला आहे.