जमीन कायद्यातील शेतजमिनीचा परतावा

By admin | Published: August 21, 2015 02:21 AM2015-08-21T02:21:18+5:302015-08-21T02:21:18+5:30

ज्या शेतकऱ्यांच्या नावावर १२ हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या जमिनी १९७५ मध्ये १९७८ चे कलम २२ अ, अन्वये शासनाने आपल्या नावे संपादित केल्या होत्या

Refund of farm land in land law | जमीन कायद्यातील शेतजमिनीचा परतावा

जमीन कायद्यातील शेतजमिनीचा परतावा

Next

दासगाव : ज्या शेतकऱ्यांच्या नावावर १२ हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या जमिनी १९७५ मध्ये १९७८ चे कलम २२ अ, अन्वये शासनाने आपल्या नावे संपादित केल्या होत्या. मात्र यावेळी ज्या शेतकऱ्यांचा नावे १२ हेक्टरपेक्षाही कमी जमिनी होत्या अशा शेतकऱ्यांच्या जमिनी चुकीने शासनाच्या नावावर चढल्या असलेल्या शेतकऱ्यांना महाराज्य स्वभियानाअंतर्गत महाड तहसील कार्यालयात आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती.
महाड तालुक्यातील दासगाव, नेराव, वहुर, पिंपळवाडी, वाळण, बुद्रु बिरवाडी, धामणे, पडवी, नांदगाव खुर्द, किंजलोली खुर्द, अडराई धुरुपकोंड, मांडले, टोळबुद्रक, केतकी कोंड, कोलोसे, सांदोसी, सोलंम कोंड अशा अठरा गावांतील जवळपास २०० शेतकऱ्यांच्या १९७५ मध्ये १९७८ चे कलम २२ अ, अन्वये ज्या शेतकऱ्यांच्या नावे १२ हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या जमिनी शासकीय खात्यात जमा केल्या होत्या. त्यावेळी काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला असेल ज्या शेतकऱ्यांची १२ हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल आणि चुकून शासनाच्या नावे झाली असेल अशा शेतकऱ्यांना महाराज्य स्वभियानाअंतर्गत महाड तालुक्यातील २२० शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी नुकतीच महाड तहसीलदारांच्या कार्यालयात प्रांताधिकारी सुषमा सातपुते व तहसीलदार संदीप कदम यांच्यासमोर सुनावणीद्वारे देण्यात आली होती. या सुनावणीसाठी १८ गावांतील जवळपास १५० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखवत म्हणणे मांडले.
तालुक्यातील २००० हजारांहून जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाच्या नावावर झालेल्या आहेत.

Web Title: Refund of farm land in land law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.