अपंगांसाठी काम करण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांनी नोंदणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:24 AM2018-04-22T04:24:47+5:302018-04-22T04:24:47+5:30

नोंदणी प्रमाणपत्र न घेतलेल्या व त्याचे नूतनीकरण न केलेल्या अनधिकृत अपंगांच्या विशेष शाळा /कार्यशाळांमध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये.

Register with voluntary organizations before working for disabled people | अपंगांसाठी काम करण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांनी नोंदणी करा

अपंगांसाठी काम करण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांनी नोंदणी करा

Next

बोर्ली-मांडला : अपंग व्यक्ती (सामान संधी, हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५च्या कायद्याप्रमाणे, स्वयंसेवी संस्थांनी तथा व्यक्तींनी अपंग क्षेत्रात कार्य करण्याकरिता प्रथम सक्षम अधिकारी यांच्याकडून नोंदणी प्रमाणपत्र घेणे आणि त्याचे वेळेवर नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत असणाऱ्या अपंग विभागामार्फत आवाहन हे आवाहन करण्यात आले आहे.

अपंग क्षेत्रात अशा प्रकारे नोंदणी प्रमाणपत्र न घेता व त्यांचे नूतनीकरण न करता, सुरू असलेल्या अपंगाच्या विशेष शाळा/कार्यशाळा या कायद्याप्रमाणे अनधिकृत असल्यामुळे कायदेशीर कारवाईस पात्र आहेत. अशा अपंगांच्या विशेष कार्यशाळा/ शाळाचालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा अनधिकृत विशेष अपंगाच्या शाळा /कार्यशाळांवर नियंत्रण नसल्यामुळे त्या ठिकाणी अपंग मुलांच्या शिक्षण पुनर्वसन व निवासाच्या दृष्टीने योग्य सुविधा उपलब्ध आहेत, याची खात्री नसलेल्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना अशा विशेष अपंगाच्या विशेष कार्यशाळा /शाळांमध्ये प्रवेश घेणेदेखील व पुनर्वसनाच्या दृष्टीने हिताचे नाही. तसेच अशा अपंगाच्या विशेष शाळा/कार्यशाळांमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार संबंधित पालक आणि संस्था असतील.
नोंदणी प्रमाणपत्र न घेतलेल्या व त्याचे नूतनीकरण न केलेल्या अनधिकृत अपंगांच्या विशेष शाळा /कार्यशाळांमध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये. नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त अधिकृत अपंगाच्या विशेष शाळा /कार्यशाळा मध्येच प्रवेश घ्यावेत.

या शाळांना मिळाले प्रमाणपत्र
रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथील भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित मतिमंद मुलांची विशेष शाळा, नवीन पनवेल येथील रोटरी क्लब आॅफ पनवेल इंडस्ट्रीअल टाउन चॅरिटेबल ट्रस्ट कर्णबधीर मुलांसाठी विशेष शाळा (निवासी), पनवेल तालुक्यातील क्रोपोली येथील कै. रामचंद्र कुरुलकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित मतिमंद आदिवासी मुलांचे कर्णबधीर विद्यालय, पनवेल तालुक्यातील काळसखंड येथील दातार इन्स्टिट्यूट फॉर स्पेशल एज्युकेशन अ‍ॅण्ड ह्युमन आॅक्टिविटीज दिशा मतिमंद मुलांची शाळा, कर्जत तालुक्यातील विनोबा मिशन संचलित विनोबा निवासी कर्णबधीर विद्यालय, कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान मतिमंद मुलांची शाळा, खालापूर तालुक्यातील खोपोली येथील शालोम एज्युकेशन ट्रस्ट सालोम मतिमंद मुलांची शाळा, पेण येथील सूचित जीवन ट्रस्ट सुमंगल मतिमंद मुलांची शाळा/कार्यशाळा, आई डे केअर सेंटर मतिमंद मुलांचे व्यसाय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग तालुक्यातील पिंपळभाट येथील पाठबळ सामाजिक विकास संस्था राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांची शाळा, मंगळ येथील सुयोग्य मेंटर्ली हँडिकॅप चॅरिटेबल ट्रस्ट सुयोग मतिमंद मुलांची शाळा, उरण येथील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान संचलित स्वीकार मतिमंद मुलांची शाळा, रोहा येथील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचलित प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा, आड शाळा ह्या नोंदणी प्रमाणपत्र शाळा प्राप्त आहेत.

Web Title: Register with voluntary organizations before working for disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.