कर्जत तालुक्यातून २७ उमेदवारी अर्जांची नोंदणी
By admin | Published: February 3, 2017 02:19 AM2017-02-03T02:19:45+5:302017-02-03T02:19:45+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवाराने नामनिर्देशनपत्र
कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवाराने नामनिर्देशनपत्र भरावयाचे आहे. त्यानंतर त्या नामनिर्देशनपत्राची प्रिंट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावयाची आहे. आजपर्यंत कर्जत तालुक्यात संकेतस्थळावर २७ जणांनी आपल्या उमेदवारी अर्जांची नोंद केली
आहे.
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद प्रभागाचे सहा गट आहेत तर पंचायत समिती प्रभागाचे बारा गण आहेत. २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र भरावयाचा कालावधी आहे. बुधवारी १ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद गटासाठी नऊ तर पंचायत समिती गणासाठी बारा अर्जांची नोंद झाली आहे तर आजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद गटासाठी दोन तर पंचायत समिती गणासाठी चार अर्जांची नोंद संकेतस्थळावर झाली आहे.
आतापर्यंत जिल्हा परिषद गटासाठी ११ तर पंचायत समिती गणासाठी १६ अशा एकूण २७ अर्जांची नोंद संकेतस्थळावर झाली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोष्टी यांनी दिली. २ फेब्रुवारीपर्यंत २७ जणांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे, मात्र त्याची प्रिंट निवडणूक कार्यालयाकडे अद्याप दाखल केली नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिली. (वार्ताहर)