उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी अनिवार्य; नसणारे यात्रेपासून राहणार वंचित

By निखिल म्हात्रे | Published: May 30, 2024 03:12 PM2024-05-30T15:12:20+5:302024-05-30T15:13:44+5:30

जिल्हा प्रशासनाचे निर्देश 

registration mandatory for holy chardham darshan in uttarakhand | उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी अनिवार्य; नसणारे यात्रेपासून राहणार वंचित

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी अनिवार्य; नसणारे यात्रेपासून राहणार वंचित

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - रायगड जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. सदर सूचनांचे पालन न करता नोंदणी न करणाऱ्यांना चारधाम यात्रेपासून वंचित राहावे लागेल असे स्पष्ट संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनसाठी  31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची "व्हिआयपी दर्शन"सुविधा देण्यात येणार नसल्याचे ऐका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले आहे. 
चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वासाठी नोंदणी अनिवार्य आहे. तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा 2024 च्या नोंदणीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी केलेल्या यात्रेकरूनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल. 

तसेच वरिष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रे पूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य  विभागाच्या  मार्गदर्शिक सुचनाचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे. उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार रायगड जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

Web Title: registration mandatory for holy chardham darshan in uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग