रायगड जिल्ह्यातील शाळा पाठवतात नियमित अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:20 PM2021-02-10T23:20:31+5:302021-02-10T23:20:43+5:30

शिक्षणाधिकारी कल्पना काकडे यांचा दावा

Regular reports are sent to schools in Raigad district | रायगड जिल्ह्यातील शाळा पाठवतात नियमित अहवाल

रायगड जिल्ह्यातील शाळा पाठवतात नियमित अहवाल

Next

रायगड :  जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा आता सुरू झाल्या आहेत. दाेन हजार १७ पैकी एक हजार ८३७ शाळा सुरू आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यापही उल्लेखनीय असल्याचे दिसत नाही. सुरू झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतचा अहवाल शाळांकडून नियमितपणे येत असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कल्पना काकडे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

काेराेनाचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच लसदेखील बाजारात आलेली आहे. त्यामुळे काेराेनाची भीती आता कमी झाल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये याआधीच सुरू करण्यात आलेली आहेत. त्यानंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये किती शाळा आहेत, त्यापैकी किती सुरू झाल्या, किती विद्यार्थ्यांपैकी किती उपस्थिती आहे. शिक्षकांसह, कर्मचाऱ्यांची चाचणी केली आहे का, यासह अन्य बाबतची माहिती शाळांना भरून द्यावी लागत आहे. त्यानंतर ती माहिती शिक्षण विभागामार्फत सरकारला सादर केली जाते. ऑनलाइन पध्दतीने सर्व माहिती भरावी लागते. काही वेळेला इंटरनेट धिम्या गतीने सुरू असल्याने अहवाल पाठवण्यास उशीर हाेताे; मात्र सरकारला परिपूर्ण अहवाल पाठवण्यात येत असल्याकडे काकडे यांनी लक्ष वेधले. आमच्यामार्फत वेळेवर आणि नियमीत अहवाल देण्यात येताे. नेटवर्कची विशेष अडचण येत नाही असे आंदाेशी मुख्याध्यापक सुनील थळे यांनी सांगितले.

ऑनलाइन अहवाल
शाळांना ऑनलाइन अहवाल द्यावा लागत आहे. मात्र काही ठिकाणी इंटरनेट धिम्या गतीने अथवा बंद असल्याने वेळेत अहवाल देता येत नाही. अशावेळी शिक्षण विभाग संबंधित शाळांकडून माहिती घेऊन ती ऑनलाइन पध्दतीने सरकारला सादर करते.

जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन अहवाल पाठवताना काही शाळा व्यवस्थापनांना अडचण येते, मात्र आम्ही त्यांच्याकडून परिपूर्ण माहिती प्राप्त करुन घेताे. त्यानंतर आम्ही सरकारला ऑनलाइन अहवाल सादर करताे.
-कल्पना काकडे (शिक्षणाधिकारी,प्राथमिक)

शाळा व्यवस्थापनाकडून केंद्रप्रमुखांना ऑनलाईन अहवाल सादर करण्यात येताे. कधी-कधी नेटवर्क खराब असल्याने अडचण येते. त्यावर मात करून आम्ही अहवाल वेळेवर पाठवताे..
रेश्मा वारगे (मुख्याध्यापक, भाल)

तालुकानिहाय अहवाल देणाऱ्या शाळा
अलिबाग-१३९
पेण-११७
पनवेल-४१७
उरण-६९
कर्जत-२९०
खालापूर-१३६
पाेलादपूर-६७
महाड-२२७
माणगाव-१०७
राेहा-१२२
म्हसळा-७९
श्रीवर्धन-६३
मुरुड-६२
सुधागड-६४
तळा-५५

Web Title: Regular reports are sent to schools in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.