जिल्ह्यात ६३ कुटुंबांचे पुनर्स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:00 AM2018-12-21T05:00:58+5:302018-12-21T05:02:05+5:30

रायगड रिव्हर्स मायग्रेशन : ११२ कुटुंबे परतीच्या वाटेवर; डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अभियान

Rehabilitation of 63 families in the district | जिल्ह्यात ६३ कुटुंबांचे पुनर्स्थलांतर

जिल्ह्यात ६३ कुटुंबांचे पुनर्स्थलांतर

Next

जयंत धुळप

अलिबाग : ‘रायगड रिवर्स मायग्रेशन’ अर्थात परजिल्ह्यात असलेल्या आणि मूळ गावी रायगडमध्ये येण्यास इच्छुक असणाऱ्या भूमिपुत्रांना जिल्ह्यात परत आणण्याचे अभियान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हाती घेतले. आतापर्यंत ६३ कुटुंबांचे जिल्ह्यात पुनरागमन झाले असून, ११२ कुटुंबे लवकरच मूळ गावी परतणार आहेत.

रोजगार, उदरनिर्वाहासाठी आपले गाव सोडून परजिल्ह्यात वा मुंबई-पुण्यासारख्या महानगरात गेलेल्या रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांना ठरावीक कालावधीनंतर मूळ गावी येण्याची आस लागते. परंतु व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाला ते शक्य होतेच असे नाही. हीच परिस्थिती गांभीर्याने लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी हे अभियान स्वदेस फाउंडेशन या अशासकीय स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने मार्च २०१८ पासून अमलात आणले आहे.
‘रायगड रिव्हर्स मायग्रेशन’ अभियानांतर्गत मूळ गावी परतू इच्छिणाºया भूमिपुत्रांची मुंबईत दर महिन्याला एक बैठक जिल्हा प्रशासन अधिकाºयांच्या उपस्थितीत होते. गावी परतून त्यांनी कोणता व्यवसाय करावा, हे त्याच्या इच्छेनुसार ठरविले जाते. व्यवसायाची निवड झाल्यानंतर आवश्यक प्रशिक्षण, संबंधित व्यवसायाच्या भेटी आदी प्रक्रि या करून त्यांना मूळ गावी व्यवसाय सुरू केला जातो. जिल्हा प्रशासन आवश्यक दाखले, अर्थसाहाय्य यासाठी सहकार्य करते. या दरम्यान कुटुंब सोईनुसार स्थलांतरित करून मुलांना शाळा प्रवेश आदी सुविधा दिल्या जातात. आतापर्यंत ६३ कुटुंबांचे रायगड जिल्ह्यात ‘रिव्हर्स मायग्रेशन’ अर्थात यशस्वी पुनरागमन झाले आहेत. ११२ कुटुंबांची प्रतीक्षा यादी तयार आहे. पुनर्स्थलांतरित झालेल्या ६३ कुटुंबांपैकी महाड तालुक्यातील १३, माणगाव २१, म्हसळा ६, पोलादपूर ८, तळा १३ आणि श्रीवर्धन तालुक्यातील दोन कुटुंबांचा समावेश आहेत.

जिल्हा प्रशासनाचा स्वतंत्र साहाय्यता कक्ष
च्मूळ गावी पुन्हा स्थलांतरित होऊ इच्छिणाºया व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी स्वतंत्र साहाय्यता कक्ष स्थापन केला आहे.
च्जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी स्वत: त्याचे अध्यक्ष तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर उपाध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर सदस्य व अन्य विविध सरकारी अधिकारी यांचा समावेश यात आहे. स्वदेस फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे व्यवस्थापक हे समितीचे सदस्य सचिव आहेत. या कक्षाचा लाभ स्थलांतरित होऊ इच्छिणाºया व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
स्वदेस स्वयंसेवी
संस्थेचे आवाहन
च्मुंबईतील ज्या बंधूंना रायगडमधील तालुक्यामध्ये गावाला परत येऊन व्यवसाय, उद्योग व शेती आधारित प्रकल्प सुरू करायचा आहे त्यांनी स्वदेसच्या अधिकाºयांना संपर्क करावा, असे आवाहन स्वदेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व महाव्यवस्थापक तुषार इनामदार यांनी केले आहे.

नथुराम धसाडे गावी परतले आणि सरपंच झाले
च्माणगाव तालुक्यातील भांदेरे (मांगरु ळ ग्रामपंचायत) गावातील नथुराम धसाडे मुंबईत एका बिल्डरकडे काम करीत होते. पत्नी व दोन मुलांसह ते मूळ गावी परतले आणि त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने शेळीपालन व शेती व्यवसाय सुरू केला. अंगभूत हुशारी, गावातल्या मित्रांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी करण्याचा आग्रह केला आणि निवडणूक जिंकून ते मांगरु ळ ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत. आपल्या सुयोग्य चरितार्थाबरोबरच गावात १४ व्या वित्त आयोगाची कामे, शाळांना मदत तसेच विविध विकासकामे ते मार्गी लावत आहेत.

संजीव धसाडे झाले
यशस्वी शेतकरी
च्माणगाव तालुक्यातील मांगरुळ ग्रामपंचायतीमधील भांदेरे गावातील संजीव धसाडे २००३ पासून मुंबईत नोकरी करीत होते. ‘रायगड रिव्हर्स मायग्रेशन’च्या माध्यमातून स्फूर्ती घेतली आणि गावी परत येऊन वडिलांची एक एकर शेती करू लागले. पाण्याची उपलब्धता झाली. स्वदेसच्या मार्फत ११ शेळ्या आणि २२ करड (मेंढ्या) घेऊन शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. आतापर्यंत या व्यवसायामधून एक लाख रुपये मिळाले. शेतीचा अनुभव नसताना, अवघ्या ६ महिन्यांत अडीच एकर शेतीमध्ये २ लाख रु पयांचे उत्पन्न मिळवले. आता माणगावला भाजीचे दुकान लावले असून दररोज ४०० ते ५०० रुपये नफा मिळतो. शेतीतून अधिक उत्पन्न मिळणार असल्याचे धसाडे आत्मविश्वासाने सांगतात.

अनिकेत खेडेकर झाले कृतिशील शेतकरी
च्एम.ए. पदवीधर तळा तालुक्यातील बोरीचा माळ या गावातील अनिकेत खेडेकर ठाणे जिल्ह्यात विरारला राहून मुंबईत दादरला डाउनअप करून नोकरी करीत होते. रोजच्या प्रवासाने कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत होते, मुंबईतील ‘रायगड रिव्हर्स मायग्रेशन’च्या मिटिंगला उपस्थित राहिले आणि त्यांनी गावात परतण्याचा निर्णय घेतला. गावात परतल्यावर स्वत:च्याच शेतीत स्वदेस स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने १ हजार झेंडूची रोपे आणि ३०० हळदीच्या रोपांची लागवड केली. झेंडू आणि हळदीचे पहिले उत्पादन आले आणि ग्रामस्थांचा आपल्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोनच बदलल्याचे ते सांगतात.
 

Web Title: Rehabilitation of 63 families in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड