पुनर्वसन समितीचे उपोषण

By Admin | Published: March 29, 2016 03:20 AM2016-03-29T03:20:18+5:302016-03-29T03:20:18+5:30

तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या घरांच्या, जमिनीच्या तसेच झाडांच्या भूसंपादनाच्या निवाड्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी काळ

Rehabilitation Committee Fasting | पुनर्वसन समितीचे उपोषण

पुनर्वसन समितीचे उपोषण

googlenewsNext

महाड : तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या घरांच्या, जमिनीच्या तसेच झाडांच्या भूसंपादनाच्या निवाड्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी काळ जलविद्युत प्रकल्प- २ पुनर्वसन समितीतर्फे २८ मार्चपासून समितीचे सदस्य व प्रकल्पग्रस्त प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी, घरे, झाडे याबाबतचा भूसंपादन विभागातर्फे ८५ कोटी ४८ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला होता. मात्र निवाडा शाखेत आयुक्त कार्यालयाकडून त्या त्रुटी काढून हा भूसंपादन आराखडा २६ कोटी इतका कमी केला. ही बाब अत्यंत अन्यायकारक असल्याचे या समितीचे सचिव किशोर सर्कले यांनी सांगून शासनाच्या चालढकलपणाचा त्यांनी तीव्र निषेध केला. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रांताधिकारी यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र सर्वांकडून प्रकल्पग्रस्तांच्या निराशा झाल्या असल्याचे सर्कले यांनी सांगितले.

Web Title: Rehabilitation Committee Fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.