शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीत

By admin | Published: June 29, 2015 3:53 AM

जेएनपीटी बंदर प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे न केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

उरण : देशातील पहिल्या क्रमांकाचे बंदर म्हणून टेंभा मिरविणाऱ्या जेएनपीटी बंदर प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे न केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.देशाच्या आर्थिक विकास आणि प्रगतीचा भाग म्हणून जेएनपीटी बंदर उभारणीसाठी शेवा आणि कोळीवाडा ही दोन्ही गावे विस्थापित केली. या दोन्ही गावांचे पुनर्वसन मात्र जेएनपीटी प्रशासनाला शासनाच्या प्रचलित पुनर्वसन कायद्याप्रमाणे तब्बल २६ वर्षांनंतरही करता आलेले नाही. जेएनपीटी बंदर प्रकल्पग्रस्तांनी बंदर उभारणीसाठी कवडीमोलाने जमिनी संपादन करून दिल्या. या गावांचे पुनर्वसन जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आले असले तरी अपुऱ्या जागेत करण्यात आलेल्या पुनर्वसनामुळे मात्र नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांतील नागरिकांवर नरकयातना भोगण्याची पाळी आली आहे.जेएनपीटी विस्थापितांना त्यांच्या गरजेनुसार आणि प्रस्थापित पुनर्वसन कायद्यानुसार कुटुंबात पाच सदस्य संख्येच्याखाली असलेल्या प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांला ३७१.६१२ स्क्वेअर मीटर, पाच सदस्यांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ५५७.४१८ स्क्वेअर मीटर तर प्रकल्पग्रस्त परंतु पाच सदस्यांच्या कमी असलेल्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबास १८५.८०५ स्के.मी आणि ५ सदस्यांपेक्षा अधिक असलेल्या भूमिहीन शेतमजुराच्या प्रत्येक कुटुंबाला २७८.७०९ स्क्वे. मी. जागा देण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र शासनाने जुन्या घरांच्या जागेप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला ४० स्क्वे.मी. ते १०० स्क्वे.मी. इतकीच जागा दिली आहे. या दिलेल्या जागेतच नवीन शेवा गावातील ४५४ कुटुंब दाटीवाटीने राहत आहेत. जेएनपीटीने विस्थापित गावांचा सर्व्हे करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे २४ जानेवारी २०१३ रोजी चुकीची दुरुस्ती करीत केंद्र सरकारने नवीन शेवा गावातील रहिवाश्यांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे करून देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. नवीन शेवा गावात ४५४ कुटुंबांना पुनर्वसन कायद्यप्रमाणे ३३.६४ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या ३३.६४ हेक्टर जागेचे जेएनपीटीने पैसेही राज्य शासनाकडे जमा केले आहेत. मात्र असे असतानाही शासनाने फक्त १५.७५ हेक्टर इतकीच जागा उपलब्ध करून दिली आहे. (वार्ताहर)