जिल्ह्यात १० हजार ९४० शेतक-यांची कर्जमुक्ती; १९ कोटी ६१ लाख रुपयांची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:41 AM2017-12-13T02:41:15+5:302017-12-13T02:41:57+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफीअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ९४० शेतक-यांना १९ कोटी ६१ लाख ९ हजार ८४६ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

Release of 10 thousand 9 40 farmers in the district; Debt waiver of 19 crores 61 lacs | जिल्ह्यात १० हजार ९४० शेतक-यांची कर्जमुक्ती; १९ कोटी ६१ लाख रुपयांची कर्जमाफी

जिल्ह्यात १० हजार ९४० शेतक-यांची कर्जमुक्ती; १९ कोटी ६१ लाख रुपयांची कर्जमाफी

googlenewsNext

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफीअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ९४० शेतक-यांना १९ कोटी ६१ लाख ९ हजार ८४६ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
यात ९३४ शेतकरी हे कर्जमाफीअंतर्गत तर १० हजार शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तो शेतक-यांच्या कर्जखात्यात (कर्जमाफी) व बचत खात्यात (प्रोत्साहनपर) जमा करण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका यांनी दिली आहे.
शासनाकडून प्राप्त ग्रीन यादीनुसार, जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज घेतलेले ५४ शेतकरी होते. या शेतकºयांना एकूण २७ लाख १४ हजार ५४४ रु पयांचे कर्ज देण्यात आले होते, जे थकीत होते. तर नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहन लाभ द्यायचा होता अशा शेतकºयांची संख्या ९७२३ इतकी असून त्यांना द्यावयाच्या लाभाची रक्कम १३ कोटी ५३ लाख १३ हजार ३०२ रु पये इतकी आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकूण ९७७७ शेतकºयांना १३ कोटी ८० लाख २७ हजार ८४६ रु पयांची रक्कम वितरित करण्यात आली. या रकमा बँकेने शेतकºयांच्या खात्यात जमा केल्या आहेत.
राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जिल्ह्यात ८८० शेतकºयांना ५ कोटी २७ लाख १९ हजार रु पये इतक्या रकमेचे कर्ज देण्यात आले होते. हा लाभ शेतक-यांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात आला आहे, तर नियमित कर्ज परतफेड करणाºया २८३ शेतकºयांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ५३ लाख ६३ हजार रु पये देण्यात आले. ही रक्कम शेतकºयांच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आली असल्याचे खोडका यांनी सांगितले.

३० जून २०१६ रोजीचे थकबाकीदार लाभास पात्र
राज्य शासनाने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख
रु पयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रु पयांवरील शेतकºयांना एक वेळ समझोता योजना लागू केली. तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रु पयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते.
२००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील त्यांनाही वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषित करण्यात आले होते. शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या रायगड जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांनी राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाइन माहिती भरून दिली होती. त्यानुसार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज घेतलेल्या रायगड जिल्ह्यातील ९हजार ७७७ शेतकºयांना तर राष्ट्रीयकृत बँकांच्या खातेदार १ हजार १६३ शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी
१९ हजार कोटी रु पयांची रक्कम बँकांकडे वर्ग केली आहे.
77लाख अर्ज या योजनेंतर्गत प्राप्त झाले. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करून ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
41लाख खात्यांमध्ये जवळपास कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रु पये इतका निधी हस्तांतरित केला आहे.

Web Title: Release of 10 thousand 9 40 farmers in the district; Debt waiver of 19 crores 61 lacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी