पांडवकड्यावर अडकलेल्या २५ पर्यटकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 05:16 AM2019-07-07T05:16:57+5:302019-07-07T05:17:02+5:30

नियमांचे उल्लंघन : पोलिसांनी केली पर्यटकांना मदत

Relief of 25 tourists stranded on a pedestal | पांडवकड्यावर अडकलेल्या २५ पर्यटकांची सुटका

पांडवकड्यावर अडकलेल्या २५ पर्यटकांची सुटका

Next




लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. मात्र, धबधब्यावर प्रवेशबंदी असतानादेखील नियमांचे उल्लंघन करीत धबधब्यावर २५ ते ३० पर्यटक गेले आणि अडकले.
अतिवृष्टीमुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्याने हे पर्यटक धबधब्यावर अडकले होते. यावेळी धबधब्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी पर्यटकांना धीर देत त्या ठिकाणाहून बाहेर काढले. पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी ठाणे, कल्याण, मुंबई, उपनगर, रायगड, पनवेल आदी ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र पर्यटकांचा अतिउत्साहीपणा काहींना आपला जीव गमवावा लागल्याने वन विभाग आणि खारघर पोलिसांनी पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. मात्र शनिवार सकाळी नऊच्या सुमारास जवळजवळ २५ ते ३० पर्यटक याठिकाणी आले. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने आणि नाला दुथडी भरून वाहू लागल्याने त्यातल्या काही तरुणांनी वाचवण्यासाठी हाक दिली.
या वेळी पांडवकडा धबधब्याच्या प्रवेश मार्गावर सकाळी दहाच्या सुमारास कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी डी. बी. सुतार, नीलेश तावडी आदी पोलिसांनी अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका केली.

Web Title: Relief of 25 tourists stranded on a pedestal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.