- आविष्कार देसाईरायगड : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राेपवे सेवा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. राेपवे सुरू झाल्याने, आता स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याने पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण हाेणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती येणार आहे.टप्प्याटप्प्याने सरकारने सर्व व्यवहार सुरळीत केले आहेत. त्यामुळे पर्यटनालाही बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी राेपवे सेवा अनलाॅकनंतरही बंद हाेती. जागेच्या वादामुळे ती बंद असल्याने पर्यटकांची चांगलीच गैरसाेय हाेत हाेती. वादग्रस्त जागा वगळून अन्य ठिकाणी राेपवे सेवा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. सध्या असणाऱ्या जागेतून सर्व यंत्रणा हलवावी लागणार आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. सध्या रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. रोपवेच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यानंतर, राेपवेची चाचणी घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून रोपवेची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. सकाळी पहिली ट्रॉली किल्ले रायगडकडे रवाना झाली हाेती. शनिवारीही या सेवेचा पर्यटकांनी लाभ घेतला.
किल्ले रायगडावर अनलाॅकनंतर पर्यटन व्यवसायाला बहर येत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण हाेणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती आली आहे. राेपवेसाठी काेणीही राजकारण करू नये, तसेच याबाबतीमध्ये वादही करू नयेत. पाेलीस बंदाेबस्तामध्ये सध्या राेपवे सेवा सुरू करण्यात आला आहे. न्यायालायाच्या निर्णयाचे स्वागत आहे.- दीपक शिंदे, काेकणकडा मित्र मंडळ, मार्गदर्शक