ग्रामीण भागातील महिलांना दिलासा, जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६१३ योजनांची कामे पूर्ण
By निखिल म्हात्रे | Published: April 27, 2024 02:04 PM2024-04-27T14:04:13+5:302024-04-27T14:04:45+5:30
Raigad News: रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४९६ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ६१३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४० योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
- निखिल म्हात्रे
अलिबाग - रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४९६ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ६१३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४० योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन, घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला आहे.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची काने गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.
या योजनेच्या माध्यमातून १५ तालुक्यांमध्ये १ हजार ४९६ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील ६१३ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची काने गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत ६१३ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पुढील महिनाभरात ४९ योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत.
- डॉ. भरत बास्टेवाड
(मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड)