सर्वसामान्यांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन केवळ २३६० रुपयांत, जिल्ह्यातील औषध दुकांनामध्ये उपलब्ब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:53 AM2020-10-23T10:53:34+5:302020-10-23T10:54:07+5:30

या औषधाचे यकृत आणि किडनीवर गंभीर परिणाम होतात. त्याचप्रमाणे, टोसीलीजुमाब औषधाचाही मृत्युदर कमी करण्यात उपयोग होत नाही.

Remedesivir injection for the general public will be available at medical in the district for only Rs 2,360 | सर्वसामान्यांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन केवळ २३६० रुपयांत, जिल्ह्यातील औषध दुकांनामध्ये उपलब्ब्ध होणार

सर्वसामान्यांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन केवळ २३६० रुपयांत, जिल्ह्यातील औषध दुकांनामध्ये उपलब्ब्ध होणार

googlenewsNext


निखिल म्हात्रे

अलिबाग  :  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. अतिगंभीर लागण झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर औषध दिले जात होते. या औषधाचे बाजारीकरण होऊन किमतीपेक्षा जास्त प्रमाणात विकले जात होते. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी निर्बंध घालून सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत विक्री करण्याचे आदेश दिले होते.

या औषधाचे यकृत आणि किडनीवर गंभीर परिणाम होतात. त्याचप्रमाणे, टोसीलीजुमाब औषधाचाही मृत्युदर कमी करण्यात उपयोग होत नाही. या औषधांचा परिणाम गंभीर म्हणजे, ‘सायकोटाइन स्टोर्म’ स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्याचा योग्य तेवढाच वापर हवा. या सर्व ‘संशोधनात्मक उपचारपद्धती’ योग्य प्रकारच्या आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी, जिथे रुग्णांवर योग्य लक्ष ठेवणे शक्य असेल, तिथेच करून बघायला हव्यात, जेणेकरून त्यांचे काही विपरीत परिणाम झाल्यास, त्यावर त्वरित उपचार करता येतील. 

कोरोनाचे एकूण रुग्ण - 52555
बरे झालेले - 49113
उपचार चालू  - 1941
बळी - 1501

जिल्ह्यात दररोज साधारण - 80 इंजेक्शन 
खुल्या बाजारात इंजेक्शन दर - 2360

खाजगी रुग्णालयातील रुग्णांना लागणारे रेमडेसिवीर हे औषध सरकारने ठरवून दिलेल्या दरातच विकले गेले पाहिजे. 

लाभदायक नाही 
रेमडेसिवीरच्या उपलब्ध दाव्यानुसार, हे औषध जर मध्यम किंवा तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले गेले, तर त्यांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये लवकर सुधारणा होऊ शकते. मात्र, कोविड मृत्युदर कमी करण्यात ते लाभदायक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. 

दोषींविरोधात कारवाई  करण्यात येईल 
जिल्हाभरातील सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडेसिवीर हे औषध पूर्णपणे मोफत केले आहे. तरी कुठल्या रुग्णाला बाहेरून रेमडेसिवीर विकत आणायला सांगितल्यास त्याची चौकशी करून त्या दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल. खाजगी रुग्णालयातील रुग्णांना लागणारे रेमडेसिवीर हे औषध सरकारने ठरवून दिलेल्या दरातच विकले गेले पाहिजे. कोणी वाढीव दराने विकत असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. 
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी

गरज असेल तरच औषध
रेमडेसिवीर औषधाची जिथे गरज नसेल, तिथे वापर केल्याने त्याचा चांगला परिणाम होण्याऐवजी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच रुग्णाला रेमडेसिवीर हे औषध दिले 
जात आहे.                  - डॉ. राजू तंबाळे

आयसीएमआरच्या शिफारसीनुसार, वैद्यकीय व्यवस्थापनाचा भर, ऑक्सिजन थेरेपी (यात नाकाद्वारे ऑक्सिजन देणे), स्टेरॉइड, टीकोएँग्यूलंट आणि इतर पूरक उपचारांचा योग्य प्रमाणात वापर, त्यासोबतच रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना मानसिक समुपदेशन, आधी असलेल्या आजारांवर उपचार या सर्व बाबींवर भर दिला जात आहे.
 

Web Title: Remedesivir injection for the general public will be available at medical in the district for only Rs 2,360

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.