ग्रामआरोग्य शिबिरामुळे दिलासा
By admin | Published: December 19, 2015 02:26 AM2015-12-19T02:26:55+5:302015-12-19T02:26:55+5:30
महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमएसीईटीपी को. आॅपरेटिव्ह सोसायटीतर्फे सुरू असलेल्या ग्रामआरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरामुळे दुर्गम ठिकाणच्या रुग्णांना मोफत
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमएसीईटीपी को. आॅपरेटिव्ह सोसायटीतर्फे सुरू असलेल्या ग्रामआरोग्य तपासणी
व औषधोपचार शिबिरामुळे दुर्गम ठिकाणच्या रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होवू शकल्यामुळे या दुर्लक्षित घटकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. एमएमएसीईटीपीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार दि. अण्णासाहेब सावंत को-आॅपरेटिव्ह अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत यांनी काढले.
एमएमएसीईटीपी आणि सत्यसाई सेवा ट्रस्ट यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सुविधांनी सज्ज अशा मोबाइल व्हॅनद्वारे गेल्या आॅगस्ट महिन्यात सुरू झालेल्या ग्रामआरोग्य शिबिराचा शतकपूर्ती समारंभ गुरुवारी पार पडला. एस. बी. पाठारे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संघटनेतर्फे हा सेवाभावी उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील अत्यंत दुर्गम ठिकाणच्या वाड्यावर आजही असंख्य रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत ही आरोग्य सेवा पोहोचणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाला प्रत्येक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केवळ साडेतीन महिन्यांच्या काळात शंभर ग्रामआरोग्य शिबिरातून ६००० रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले. एमआयडीसी असेपर्यंत आरोग्य सेवेचा हा उपक्रम असाच अखंडपणे सुरु राहील अशी ग्वाही देखील पठारे यांनी यावेळी दिली. यावेळी डीवायएसपी प्रांजली सोनावणे तहसीलदार संदीप कदम, सत्यसाई सेवा ट्रस्टचे रमेश सावंत, अमृत गोराई आदींनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)