रोह्यातील असुविधा दूर करणार; रुग्णालयातील गैरसोयीबाबत तहसीलदारांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:25 AM2019-03-30T00:25:23+5:302019-03-30T00:25:37+5:30
नितीश भातखंडे या २८ वर्षीय तरुणाच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रोहा तहसीलदार यांनी उप जिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत शुक्रवारी नागरिकांसह बैठक घेतली.
रोहा : नितीश भातखंडे या २८ वर्षीय तरुणाच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रोहा तहसीलदार यांनी उप जिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत शुक्रवारी नागरिकांसह बैठक घेतली. यावेळी रुग्णालयातील गैरसोयीमुळे तालुक्यातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तरु णांच्या समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी रुग्णालयातील असुविधा दूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नांबरोबरच, १०८ रु ग्णवाहिका सेवेच्या अनुपलब्धतेबाबतही संबंधित एजन्सीला विचारणा करणार असल्याचे तहसीलदार कविता जाधव यांनी उपस्थितांना सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार हा काही रोहेकरांसाठी नवीन नाही, नितीश सोबतची दु:खद घटना गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी रोह्यातील तरु णांनी पुढाकार घेऊन श्री विठ्ठल मंदिरात जमून गावकऱ्यांसमवेत झालेल्या विचारविनिमयानंतर रोहा तहसीलदारांची यासाठी वेळ मागितली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचून दाखवला.
शासकीय सुटीच्या दिवशी
रु ग्णालय पूर्णपणे बंद असल्याने एखादी दुर्घटना घडलीतर ती जीवावर बेतते, रु ग्णालय दक्षता समितीची मुदत संपली असल्याने, ती नव्याने नेमावी व त्यामध्ये सामाजिक प्रतिनिधी म्हणून संस्थेच्या कार्यकर्त्यांची नेमणूक व्हावी, जेणेकरून रु ग्णालयात सुविधा उपलब्धतेसाठी हातभार लागेल अशा मागण्यांचे निवेदन तालुका प्रशासकीय प्रमुखांना दिले. तहसीलदार कविता जाधव यांनी सर्व बाबी ऐकून घेऊन त्याबाबत लक्ष घालून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले. निवेदन देताना उपजिल्हा रु ग्णालयातील अनेक समस्यांवर चर्चा केली. त्या वेळी तहसीलदार कविता जाधव यांनी सर्व बाबी ऐकून घेऊन त्याबाबत लक्ष घालून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले. या वेळी उपजिल्हा रु ग्णालयाचे अतिरिक्त भार असलेल्या डॉक्टर खैरकर, रोहे नगर परिषद मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, रोहे समन्वय समितीचे अध्यक्ष संजय कोनकर आदी उपस्थित होते.
आरोग्य सेवेबाबतच्या प्रमुख समस्या
उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे, नियुक्ती रद्द करणे, विंचूदंश , सर्पदंश , श्वानदंश यावर आवश्यक ते औषधोपचार उपलब्ध करून देणे, वेगवेगळ्या साथीच्या आजारांवर लागणारी प्रतिजैविके यांचा साठा देखील अत्यल्प आहे.
दुपारी ३ ते ७ यावेळेत १०८ रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर उपलब्ध नसणे , रुग्णालयातील कार्यरत असलेले डॉक्टर स्वत:चे खासगी दवाखाने चालवतात त्यामुळे उपजिल्हा रु ग्णालयात येणाºया रु ग्णांना खासगी दवाखान्यात येण्याचा सल्ला दिला जातो अशा समस्या आहेत.