शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

रोह्यातील असुविधा दूर करणार; रुग्णालयातील गैरसोयीबाबत तहसीलदारांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:25 AM

नितीश भातखंडे या २८ वर्षीय तरुणाच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रोहा तहसीलदार यांनी उप जिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत शुक्रवारी नागरिकांसह बैठक घेतली.

रोहा : नितीश भातखंडे या २८ वर्षीय तरुणाच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रोहा तहसीलदार यांनी उप जिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत शुक्रवारी नागरिकांसह बैठक घेतली. यावेळी रुग्णालयातील गैरसोयीमुळे तालुक्यातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तरु णांच्या समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी रुग्णालयातील असुविधा दूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नांबरोबरच, १०८ रु ग्णवाहिका सेवेच्या अनुपलब्धतेबाबतही संबंधित एजन्सीला विचारणा करणार असल्याचे तहसीलदार कविता जाधव यांनी उपस्थितांना सांगितले.उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार हा काही रोहेकरांसाठी नवीन नाही, नितीश सोबतची दु:खद घटना गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी रोह्यातील तरु णांनी पुढाकार घेऊन श्री विठ्ठल मंदिरात जमून गावकऱ्यांसमवेत झालेल्या विचारविनिमयानंतर रोहा तहसीलदारांची यासाठी वेळ मागितली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचून दाखवला.शासकीय सुटीच्या दिवशीरु ग्णालय पूर्णपणे बंद असल्याने एखादी दुर्घटना घडलीतर ती जीवावर बेतते, रु ग्णालय दक्षता समितीची मुदत संपली असल्याने, ती नव्याने नेमावी व त्यामध्ये सामाजिक प्रतिनिधी म्हणून संस्थेच्या कार्यकर्त्यांची नेमणूक व्हावी, जेणेकरून रु ग्णालयात सुविधा उपलब्धतेसाठी हातभार लागेल अशा मागण्यांचे निवेदन तालुका प्रशासकीय प्रमुखांना दिले. तहसीलदार कविता जाधव यांनी सर्व बाबी ऐकून घेऊन त्याबाबत लक्ष घालून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले. निवेदन देताना उपजिल्हा रु ग्णालयातील अनेक समस्यांवर चर्चा केली. त्या वेळी तहसीलदार कविता जाधव यांनी सर्व बाबी ऐकून घेऊन त्याबाबत लक्ष घालून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले. या वेळी उपजिल्हा रु ग्णालयाचे अतिरिक्त भार असलेल्या डॉक्टर खैरकर, रोहे नगर परिषद मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, रोहे समन्वय समितीचे अध्यक्ष संजय कोनकर आदी उपस्थित होते.आरोग्य सेवेबाबतच्या प्रमुख समस्याउपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे, नियुक्ती रद्द करणे, विंचूदंश , सर्पदंश , श्वानदंश यावर आवश्यक ते औषधोपचार उपलब्ध करून देणे, वेगवेगळ्या साथीच्या आजारांवर लागणारी प्रतिजैविके यांचा साठा देखील अत्यल्प आहे.दुपारी ३ ते ७ यावेळेत १०८ रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर उपलब्ध नसणे , रुग्णालयातील कार्यरत असलेले डॉक्टर स्वत:चे खासगी दवाखाने चालवतात त्यामुळे उपजिल्हा रु ग्णालयात येणाºया रु ग्णांना खासगी दवाखान्यात येण्याचा सल्ला दिला जातो अशा समस्या आहेत.