शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

चरी-गोपचरी आणि शहापूर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 4:41 AM

कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक होण्याच्या समस्येला आळा घालण्याकरिता...

- जयंत धुळपअलिबाग  - कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक होण्याच्या समस्येला आळा घालण्याकरिता, हे समुद्र संरक्षक बंधारे रोजगार हमी योजनेतून दुरुस्त करून स्थानिक ग्रामस्थांना त्यांच्याच गावात रोजगार आणि भातशेतीचे रक्षण असा दुहेरी हेतू साध्य करण्याकरिता समुद्र संरक्षक बंधाºयांची कामे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घेण्याचा, श्रमिक मुक्ती दलाच्या शहापूर, धेरंड गावांतील शेतकरी शिष्टमंडळास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिलेला शब्द वास्तवात उतरला आहे.रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी खारभूमी विकास विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेवून याबाबत विचार विनिमय करून संरक्षक बंधाºयांची कामे रोजगार हमी योजनेतून कशी घेता येतील याबाबत मार्गदर्शन केले होते. दरम्यान, गेल्या २६ मे २०१६ रोजी खारभूमी विकास विभागाने बोलावलेल्या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी खाजगी खारभूमी योजनांच्या दुरुस्तीवर शासकीय निधी खर्च करता येत नाही म्हणून खाजगी खारभूमी योजनांची दुरुस्ती होत नाही. ३७ वर्षात या खाजगी खारभूमी योजनांच्या दुरुस्तीवर शासनाच्या खारभूमी विकास विभागाने एकही पैसा खर्च केलेला नाही, त्यामुळे फुटणारे संरक्षक बंधारे ग्रामस्थांना आपली भातशेती आणि घरे वाचविण्याकरिता स्वखर्चाने व स्वकष्टाने सामूहिक श्रमदानातून बांधावे लागतात. मात्र हे काम राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून केल्यास ग्रामस्थांना त्यांच्याच गावात रोजगार मिळेल आणि संरक्षण बंधारे देखील बांधून होतील असा प्रस्ताव मांडला होता.कामे दृष्टिपथातया सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांची राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जॉबकार्ड करुन घेण्याचे निर्देष संबंधित विभागास दिले होते. श्रमिक मुक्ती दलाने या संदर्भात ग्रामस्थ शेतकºयांशी संवाद साधून ग्रामस्थांची जॉबकार्ड तयार झाली आणि रोजगार हमीतून संरक्षक बंधाºयांची कामे दृष्टिपथात आली होती.शासन निर्णयानुसार खारभूमी विकास विभागाची मंजुरीअलिबाग तालुक्यातील चरी-गोपचरी खारभूमी योजना आणि मोठे शहापूर खारभूमी योजना या दोन योजनांतील संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीची कामे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करण्याकरिता शासन निर्णय-मग्रारोहयो-२०१०/रोहयो-१० दि.८जून२०१० या शासन निर्णयानुसार खारभूमी विकास विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार चरी-गोपचरी खारभूमी योजनेच्या २२ लाख रुपयांच्या तर मोठे शहापूर खारभूमी योजनेच्या कामास २२ लाख ६३ हजार ५७० रुपयांच्या खर्च अंदाजपत्रकास मंजुरी २१ मार्च २०१८ रोजी देण्यात आली.६ लाख ६० हजार रुपये मजुरीचरी-गोपचरी खारभूमी योजनेतील संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीचे काम सुरु होवून ९० टक्के पूर्ण झाले आहे तर उर्वरित १० टक्के काम येत्या चार-पाच दिवसांत पूर्ण होणार आहे. मंजूर निधी २२ लाख रुपयांपैकी ४० टक्के रोजगार हमी मजुरी आणि ६० टक्के वाळूदगड व यंत्रसामग्री असे प्रमाण असल्याने २२ लाख रुपयांपैकी ४० टक्के म्हणजे सुमारे ६ लाख ६० हजार रुपये मजुरी काम केलेल्या जॉबकार्डधारक शेतकरी ग्रामस्थांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. योजनेच्या दुरुस्तीकरिता सरासरी १०० मजूर कार्यरत होते परिणामी एका शेतकºयास ६ हजार ६०० रुपये रोहयो मजुरी मिळणार आहे. हे काम १५ दिवस होते परिणामी एका मजुरास एक दिवसाची मजुरी किमान ४०० रुपये प्राप्त होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या किमान २००रुपये मजुरीपेक्षा ती अधिक असल्याने ग्रामस्थ शेतकºयांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.मोठे शहापूर खारभूमी योजनेकरिता निधी मंजूरमोठे शहापूर खारभूमी योजनेकरिता देखील २२ लाख ६३ हजार ५७० रुपयांचा निधी मंजूर झाला असून या योजनेला २१ मार्च २०१८ रोजी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असून संरक्षक बंधाºयांची कामे अल्पावधीत सुरु होत आहेत.मोठे शहापूर गावातील ४० ग्रामस्थांची ४० नवीन जॉबकार्ड तयार झाली असून उर्वरित कार्ड तयार करण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनीदिली आहे.अलिबागमध्ये १ हजार ५१५ तर पेणमध्ये ९९७ हेक्टर भातशेती होणार पुनर्प्रापितअलिबाग तालुक्यांतील चरी-गोपचरी आणि मोठापाडा शहापूर खारभूमी योजनेप्रमाणेच उर्वरित हाशिवरे, रांजणखार-मांडवखार, कालवड, खातीवरा आणि सांबरी या पाच तर पेण तालुक्यांतील बोरी,पांडापूर,कासू,डोलवी आदि एकूण सात खारभूमी योजनांची कामे देखील रोजगार हमीतून होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.च्या कामांच्या पूर्ततेअंती अलिबाग तालुक्यांत १ हजार ५१५ हेक्टर तर पेण तालुक्यांत ९९७ हेक्टर भातशेती पुनर्प्रापित होणार आहे,ही मोठी जमेची बाजू असल्याचे भगत यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या