रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
By admin | Published: January 28, 2017 02:53 AM2017-01-28T02:53:01+5:302017-01-28T02:53:01+5:30
भारतीय प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या
अलिबाग : भारतीय प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ््यात रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
याप्रसंगी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर आदी उपस्थित होते. पोलीस पथक, दंगल नियंत्रण, महिला पोलीस, जिल्हा वाहतुक शाखा पोलीस, होमगार्ड पथक, जा. र .ह. कन्याशाळा आरएसपी, स्काऊट गाईड, पोलीस वाद्यवृंद पथक, दामिनी, बीट मार्शल, बाँबशोध व नाश पथक, फॉरेन्सीक लॅब पथक, अलिबाग नगरपरिषद अग्निशामक दल या सर्व पथकांनी जिल्हाधिकाऱ्यांना व उपस्थितांना संचलनाव्दारे मानवंदना दिली.
गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक विजेते सावता महादेव शिंदे (पोलीस निरीक्षक, खोपोली ) मोहन मोरे (सायबर सेल, पोलीस अधिक्षक कार्यालय, रायगड), पांडुरंग खेडकर (पोलीस हवालदार, रोहा) यांचा ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी तेली-उगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेहरु युवा केंद्र, रायगडच्या वतीने रायगड जिल्हयातील सर्वोत्कृष्ट कार्य करणारे युवा मंडळ-संगीता मच्छिंद्र ठाकूर फाऊंडेशन, धुतुम, उरण या युवा मंडळाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतही गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यात विशेष प्राविण्य मिळविलेल्या सुप्रिया हंडाळ ही रायगड जिल्हयातील विद्यार्थिनी ९७.६० टक्के गुण मिळवून मुंबई मंडळातून प्रथम
क्र मांकाने उत्तीर्ण झाल्याने तिला एक लाख रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रक, अवनी गायकवाड ही विद्यार्थिनी मुंबई शिक्षण मंडळात गुणवत्ता यादीत ९६.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने तिला ५० हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभागाच्या योजना अंतर्गत उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लावत पर्यावरणासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा प्रसाद पां. तांडेल, ऋ तुजा गोळे यांचा सन्मान करण्यात आला.