कर्जत तालुक्यात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण सुरू
By admin | Published: September 17, 2016 02:16 AM2016-09-17T02:16:36+5:302016-09-17T02:16:36+5:30
कर्जतमधील १८९ विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्र माला १६ सप्टेंबरपासून सुरु वात झाली.
कर्जत : कर्जतमधील १८९ विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्र माला १६ सप्टेंबरपासून सुरु वात झाली. नवीन मतदार नोंदणी, दुबार मतदार, स्थलांतरित, नावात बदल अशी कामे करीत असताना संबंधित प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीबद्दल तक्र ार असल्यास त्याविरुद्ध हरकती आणि दावे देखील करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०१७ रोजी निवडणूक आयोग जाहीर करणार असल्याची माहिती कर्जत विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी, तथा कर्जतचे प्रांत अधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिली.
राज्यात निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०१७ या तारखेवर आधारित १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांंचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्र म हाती घेण्यात आला आहे. त्यासंबंधी माहिती मतदान नोंदणी अधिकारी दत्ता भडकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. कर्जत विधानसभा मतदार संघात ३१० मतदान केंद्रे असून त्यात कर्जत तालुक्यात १९६ आणि खालापूर तालुक्यातील ११४ मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्या सर्व मतदान केंद्रावर १६ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी लावण्याचे काम सुरु करण्यात आले. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत प्रारूप मतदार यादीबद्दल हरकती आणि दावे दाखल करता येणार आहेत. याच कालावधीत येणाऱ्या १८ सप्टेंबर आणि ९ आॅक्टोबर या दोन रविवारी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. कर्जत तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर पद निर्देशित अधिकारी सर्व अर्ज घेऊन उपस्थित असतील. हरकती, दावे यांच्यावर निर्णय होऊन ५ जानेवारी रोजी निवडणूक आयोग छायाचित्र मतदार यादीची अंतिम पुनर्निरीक्षण करण्यात आलेली यादी प्रसिद्ध करणार आहे. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार रमेश देशमुख, तालुका गटशिक्षण अधिकारी बी. यू. डंबाये, तालुका सहकार सहनिबंधक वैभव काळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)